“……. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“……. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी भारतीय समाज व्यवस्थेत अiमृलाग परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने विशेष क्रांतिकारी कार्य केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिकारी समाज सुधारक, अस्पृश्यांचे उद्धारक ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, बौद्ध धम्म प्रवर्तक ,त्याचप्रमाणे एक महान शिक्षण तज्ञ होते.
तथागत बुद्ध आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर भारत देश व जगासमोर न भूतो न भविष्यती अशा कार्यकर्तृत्वामुळे परिवर्तनाचे दिशादर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिले जात आहे. सामाजिक परिवर्तनाच्या या अग्रदूताच्या बुद्धीची झेप त्यांची हुशारी त्याचबरोबर त्यांचा सहानुभाव आणि त्यांची जिद्द, चिकाटी साऱ्या गोष्टी ह्या आपल्याला या जीवनात अलौकिक अशा वाटतात. त्यामुळे समता ,स्वातंत्र्य ,बंधुभाव , न्याय या नीती मूल्याच्या आधारे भारतीय संविधानाची निर्मिती करून, देशाच्या सर्वांगीण विकासात सिंहाचा वाटा असल्यामुळे आणि भारताला अखंड सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र अशी ओळख करून दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे आकर्षण बनले आहेत .विषमतेच्या ज्वाला शांत करणाऱ्या दयासागराची क्रांतीने मशाल हातात घेऊन मानवतेवरील कलंक पुसून टाकला आहे. जातीवादी वर्णभेदामुळे शाळेच्या बाहेर बसणाऱ्या या महामानवाने देशाचे संविधान लिहिले हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. देशाच्या राजकीय ,सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, वाटचालीसाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक ठरलेल्या या भारतीय संविधानाच्या निर्मितीपुरते ते मर्यादित नाही. त्यांच्या कर्तबदारीचा आवाका फार मोठा आणि विविध अंगी असून या महामानवच्या व्यक्ती महत्त्वाचे अनेक श्रेष्ठ पैलू आम्ही आत्मसात केले पाहिजे .आणि बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा सर्व समाज घटकांपर्यंत आपण चालविण्याचा संकल्प केला पाहिजे .त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल ,असे मला वाटते.
*….भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,महामानव ,बोधिसत्व, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ii….🙏🙏
(राजाभाऊ गडलिंग,)
महाराष्ट्र शासनाचा:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त …
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत