दिन विशेषदेश-विदेशमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बाबासाहेब..!

तुम्हाला खूप गोष्टी करता आल्या
मरता मात्र आलं नाही तुम्हाला!
ज्वालामुखीच्या धबधब्याखाली उभं राहून
निर्माण केलं तुम्ही चांदण्यांचं अंतरीक्ष
विझलेल्या हातात दिल्या तुम्ही क्रांतीच्या विजा,
हरलेल्या डोळ्यांपुढं मांडला तुम्ही स्वप्नांचा समारंभ
आणि अनुवाद केला भीषण रात्रींचा तुम्ही
समाजवादी संग्रामात..!

तुम्ही उगवलात सतत मृत्यूच्या क्षितीजातून
मृत्यूच्या जळत्या उंटावर स्वार होऊन,
जिंदगीच्या वाळवंटाला तुम्ही तारांगणाची दीक्षा दिली
घृणेचा प्रचार करणाऱ्या शब्दांना
तुम्ही मनुस्मृतीसोबतच चितेत फेकलं
असहिष्णुतेची हरळी मुळासकट उपटण्याचा
अभ्यासक्रम शिकवला तुम्ही दुनियेला…
कोसळलेली माणसं उभी करणारा
सिद्धांत मानते आता दुनिया तुम्हाला…
तुमचं सतत उगवणं वाचलं
आणि मृत्यने वाचला मृत्यूला मृत्यू देणारा
प्रबोधनप्रकल्प.

आम्ही पाहिलीत खूप माणसं मरताना
मृत्यूपुढे लोळागोळा होताना
आणि एक तुम्ही असे निघालात
ज्यांच्यापुढे खुद्द मृत्यूलाही मरण्यात गर्व वाटला.
सहा डिसेंबर १९५६ नंतर दुनिया तुम्हाला
मरण मारणारा जीवननायक म्हणून ओळखते!
मृत्यूला शिकवलात तुम्ही उजेडाचा सन्मान करण्याचा धडा
मृत्त्यने दिला तुम्हाला मृत्यूविहीन जन्म
आणि तुमचं मावळणं विसरूनच गेलं तुम्हाला.
सहा डिसेंबरला दुनियेचं प्रथमच
कोट्यवधी सूर्यांनी पिसारलेलं क्षितिज पाहिलं
पाहिला सहा डिसेंबरच्या माथ्यावर उमललेला
क्रांतीच्या जन्मदिवसाचा अजिंठा
पाहिला तुमच्या मृत्यूचा मृत्युदिवस
आणि साऱ्या दुनियेनही आता
तुमचा मृत्यू अमान्यच केला आहे.
.
उद्धारकर्त्या महामानवास, महासूर्यास, भिमसूर्यास महापरिनिर्वाणदिनी कोटी कोटी नमन..!🙏🏻🙏🙏🙏
.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!