देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

समाजात जातींचं ध्रुवीकरण केव्हा होतं ?

बाबासाहेब आपल्या जाती निर्मितीच्या कारणमीमांसेवर भाष्य करणाऱ्या ऐतिहासिक निबंधात म्हणतात,

“ब्राह्मणांनी आपलं स्वतःचं वर्तूळ करून घेतलं आणि इतरांना (ब्राह्मणेतरांना) वाऱ्यावर सोडलं. त्यांना त्यांची वर्तुळे तयार करून घ्यावी लागली.
काहींनी ब्राह्मणांच्या अनुकरणातून तर उर्वरितांनी गरजेनुसार/ उपलब्धतेनुसार तसेच जितकं आपल्या निकटच्या वरच्या जातीचं अनुकरणाला वाव असेल त्यानुसार, आपली संस्कृती (संस्कृती कसली म्हणा काळाची अपरिहार्यताच ती !) म्हणजे खान-पान, रहन-सहन, वेशभूषा केशभूषा वगैरे अनुसरलं”
(Dr Babasaheb Ambedkar: Castes in India; their mechanism, genesis and development. Columbia University-1916)

हे घडण्याचं कारण म्हणजे ब्राह्मणांची स्वार्थी/अप्पलपोटी संकुचित बेजबाबदार मनोवृत्ती.
त्यानी फक्त मंदिरं बांधून स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था करून घेतली आणि इंग्रजी शिकून प्रशासनात आय ए एस, आय पी एस, तसेच ब्रिटिश सरकारच्या कारभारात स्टेनो टायपिस्ट आणि कारकुनांच्या नोकऱ्या पटकावल्या, पोरांना इंग्लंड अमेरिकेत पोटापाण्यासाठी पाठवण्याची व्यवस्था केली.

ब्राह्मणांनी समाजाचं कधीही पालकत्व स्वीकारलं नाही, समाजाला सुरक्षित न करता वाऱ्यावर सोडलं म्हणून आपापल्या जातींसाठी सर्व जाती माती खाताहेत म्हणजेच आपापल्या जातींचं अस्तित्व सांभाळण्याचं/टिकविण्याचं राजकारण करताहेत.

महारांमधले रक्ताचे भक्त सुद्धा त्याच प्रवृत्तीचं प्रदर्शन करताहेत.

आंबेडकरवादी बौद्ध मात्र जे समाजकारणात, राजकारणात योग्य भूमिका घेऊन पुढे येतात त्यांच्या सोबत उभे असतांना दिसतात, तसेच रक्त-भक्तांच्या मूर्खपणाच्या असंस्कृत ट्रोलिंगला न जुमानता स्वतःची परखड मतं निर्भीडपणे मांडतात. शिवाय निर्भीडपणे मते मांडणाऱ्या निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वम्भर चौधरी, प्रज्ञा पवार, टिस्टा सेटलवाड, रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, यशोमती ठाकूर आणि योगेंद्र यादव यांच्या रक्षणासाठी आणि कामरादरी (comradeship) साठी खांद्याला खांदा भिडवून सोबत उभे राहातात.

हीच आंबेडकरवादी मंडळी उमर खालिद, शारजील इमाम यांच्या बेल अर्जावर सुनावणी होण्याची मागणी करतात म्हणजेच हे दोघेही मुसलमान आहेत तर आम्ही कशाला ही बेल मिळण्याची मागणी लावून धरायची ?असं म्हणत नाहीत हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसंशा करण्याजोगं नाही काय ?

भीमा-कोरेगावच्या केस मधली खोटे एव्हिडन्स लॅपटॉप मध्ये घुसडून यूएपीए या राक्षसी कायद्याखाली देवेंद्रजी फडणवीसांच्या पोलिसांनी जेलमध्ये टाकलेल्या निष्पाप विद्वानांच्या सुटकेसाठी हीच आंबेडकरवादी मंडळी प्रयत्न करीत नाहीत काय ?
इथे कुठे जात पाहिली जातेय ?

जेव्हा स्टॅन स्वामी, जी एन साईबाबा हे शहीद झाले, तसेच हैदराबाद चा रोहित वेमुला शहीद झाला, इतकेच काय तर नरेंद्र दाभोलकर, कॉम. गोविंद पानसरे, के के कलबुर्गी आणि गौरी लंकेश या शहिदांचं हौतात्म्य वाया न जाऊ देण्याच्या आणाभाका खाऊन समाजाचं प्रबोधन याच आंबेडकरवाद्यांनी जाती-पाती पलीकडे जाऊन केले ही वस्तुस्थिती नजरेआड करता येईल का ?

देशाला गरजेचा असलेला हाच तो सर्वसमावेशक आंबेडकरवाद !

या आंबेडकरवादाचा मी एक अविभाज्य घटक असल्याचा मला अभिमान वाटतो.

आपण ही मानसिकता कौतुकाला, प्रसंशेला पात्र मानून सर्व जातींनी अनुसरावी म्हणून प्रबोधन करूया.

जय भिम, जय संविधान, जय भारत.

डॉ संजय अपरांती,
संस्थापक: बहुजन हितकारिणी सभा.
संचालक: अपरांती अकॅडेमी.
नाशिक, 21.11.2024.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!