निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

ईव्हीएम हॅक आरोप गुन्हात कार्यवाही का होत नाही ?..राजेंद्र पातोडे.

ईव्हीएम बाबत खोटा प्रचार करून जनतेला भडकावण्याचा आरोप करीत सय्यद शुजा विरोधात मुंबईत निवडणुक आयोगाने आणखी एक एफआयआर दाखल केला आहे.निवडणुक आयोगाचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा खोटा दावा करणाऱ्या, चुकीची माहिती पसरवणाऱ्या किंवा अशा प्रकरणांमध्ये खळबळ माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत निवडणूक आयोगाने सदर एफ आय आर नोंदवला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये सय्यद शुजा आजतकच्या दोन पत्रकारांशी बोलत आहे. हा व्हिडिओ आज तक च्या विशेष तपास स्टोरीचा भाग होता, ज्यामध्ये आजतक पत्रकारांनी मविआ आघाडी पक्षाच्या ज्येष्ठ खासदारासाठी काम करणारे गोपनीय अधिकारी म्हणून पात्र वठविले होते. सदर खासदार ह्यांचे सोबत सय्यद शुजा या अमेरिकेतील हॅकरने संपर्क केला होता, त्यात यूएस संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएमएस हॅक केल्याचा दावा करीत त्याच्या बाजूने निकाल यावा त्यासाठी ५४ कोटी रुपयांची मागणी केली.
त्याच स्टिंग ऑपरेशनमध्ये सय्यद शुजाचा व्हिडिओ रेकॉर्ड होवून १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित करण्यात आली.त्याचे शीर्षक होते, ‘५३ कोटी द्या आणि ६३ जागांचे ईव्हीएम हॅक करू’, महाराष्ट्र निवडणुकीत एमव्हीए खासदाराला हॅकरची ऑफर.त्यानंतर हाच व्हिडिओ इंडिया टुडे ग्रुपच्या मुंबई तक वाहिनीवर प्रकाशित झाला होता.
वास्तविक पाहता असाच दावा त्याने २०१९ मध्ये देखील केला होता.शुजा याने लंडनमधील पत्रकार परिषदेत भारतीय ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा केला होता.२०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्याने ईव्हीएम हॅक केले होते.त्यासाठी भारतीय राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संपर्क साधला होता.हॅकरने ट्रान्समीटरद्वारे ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला होता.
त्याने केलेल्या दावा नुसता खळबळजनक होता असे नाही तर त्यात अनेक गंभीर आरोप होते.
सईद शूजाने केलेले काही महत्त्वाचे दावे असे होते की,
इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशन ऑफ युरोप आणि फॉरेन प्रेस असोसिएशन लंडन यांनी ही परिषद आयोजित केली होती यामध्ये ईव्हीएम हॅकिंगबाबत दावा करण्यात आला होता.
ECIL याकंपनीने २०१४ निवडणुकीसाठी EVMs बनवले होते.
२०१४ च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होते, त्यामुळेच त्यांची हत्या झाली.
लोकसभा निवडणुकीत १४ लोकांच्या टीमने हे काम केले होते. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा होता.
ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने भाजपला ‘लो फ्रेक्विनसी सिंग्नल’ मिळवून दिले. आमच्या तज्ज्ञांनी भाजपचा डाव हाणून पाडला नसता तर राजस्थान, छतीसगड, मध्यप्रदेश भाजपचा विजय झाला असता.
दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केले असल्याचाही दावा करण्यात आला होता.
डेटा ट्रान्समीट करण्याचे नेटवर्क रिलायन्सकडे आहे. त्याचा भाजपला फायदा झाला.
ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने भाजपला ‘लो फ्रेक्विनसी सिंग्नल’ मिळवून दिले
ईव्हीएममध्ये घोटाळा झाला याची जाणीव इतर कर्मचाऱ्यांना नव्हती. डेटा एन्ट्री करत असल्याचे त्यांना वाटत होते.
गौरी लंकेश या ज्येष्ठ महिला पत्रकाराला ईव्हीएम घोटाळ्याबद्दल माहिती होती. त्यांनी या घोटाळ्याची माहिती प्रकाशीत करण्याची तयारीही दर्शविली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
रिलायन्स जियो या कंपनीने भारतीय जनता पक्षाला ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत केली. यासाठी त्यांनी कमी वारंवारतेचे तरंग (फ्रिक्वेन्सी) पुरवले असा खळबळजनक दावा शुजाने केला होता.
भारतीय जनता पक्षासोबतच समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस देखील ईव्हीएम हॅक करण्याच्या कारस्थानात गुंतल्याचे त्याने म्हटले होते.
ब्ल्यूटूथने ईव्हीएम हॅक करता येत नाही.ग्रॅफाइटवर आधारित ट्रान्समिटरने हॅकिंग शक्य असते.या ट्रान्समिटरच्या मदतीने २०१४ मध्ये घोटाळे करण्यात आले असा त्याचा दावा होता.
भाजपने मिलिट्री ग्रेडफ्रिक्वेन्सी ट्रान्समिट मॉड्यूलर वापरले.भाजपने कमी फ्रिक्वेन्सीच्या मशीनच्या चाचणीचा प्रयत्न केला.ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपानंतर भाजपने तज्ज्ञांनाही हॅक करता न येणाऱ्या ईव्हीएमचा वापर केला होता.रिलायन्स जिओने लो फ्रिक्वेसी सिग्नल हॅकसाठी मदत केली. जिओकडे डाटा ट्रान्समिट करण्यासाठी नेटवर्क आहे.त्याचाच लाभ भाजपने घेतला असे अत्यंत गंभीर आणि खळबळ उडवून देणारे आरोप त्याने केले होते.
२३ जानेवारी २०१९ निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून दिल्ली पोलिसांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद सुजा यांच्याविरोधात एफ आय आर नोंदवला होता. शुजा व्यतिरिक्त इतरांवरही एफआयआर नोंदवण्यात आला होता.हा त्याचे विरुद्ध दाखल पहिला गुन्हा होता.मात्र गेल्या पाच वर्षांत त्याचे काय झाले ? पोलिसांनी तपास कसा केला ? आरोपीला अटक का करू शकले नाही ? त्याने केलेल्या आरोपा बाबत काय माहिती मिळाली ? असे कुठलेही उत्तर देण्याची तसदी निवडणुक आयोगाने का घेतली नाही ? देशाच्या निवडणुक प्रक्रिये वर प्रश्न चिन्ह निर्माण होताना त्याचा तपास गांभीर्याने का झाला नसावा ? एखाद्या न्युज चॅनेल चे पत्रकार शुजा सोबत संपर्क साधू शकतात तर दिल्ली पोलिसांना ते का जमले नाही ? विशेष म्हणजे दिल्ली पोलिस हे केंद्रीय गृह विभागाचे अखत्यारीत आहेत.देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत.तरी देखील त्यांना आरोपी का सापडला नसेल ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील ह्या बाबत पुढे काय केले ह्याचा खुलासा केलेला नाही.त्यामुळे आता काल परवा दाखल झालेल्या गुन्ह्यात किती गांभीर्याने तपास होणार आहे.ह्याची खात्री नाही.

राजेंद्र पातोडे
अकोला
9422160101

evm #ElectionCommissionOfIndia n

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!