दिन विशेषदेशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

“विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही,

जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही…या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय… आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”, ही एक समाज माध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर….

“पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती…!!!” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल.

…यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं वर्णन करायचंच झालं तर….
“नवसे पुत्र होती। तरी का करावा लागे पती।।” या तालावर, “ईव्हीएम कारणे विजयी होती, तरी का प्रचार करावा लागे निवडणुकीप्रती”, असं करावं लागेल, बस्स्!

…पूर्वी ‘मटका’ लावला जायचा, आता EVM लावला जातो, एवढाच फरक.

…लक्षात ठेवा, मतपेटीतून परिवर्तन होईलसं दिसेनासं झालं; तर, अखेरीस जनता स्वतःच्या हाती सूत्रं घेते आणि अराजकसदृश पार्श्वभूमी तयार होऊ लागते!

…सत्ताधाऱ्यांच्या ‘स्टार-प्रचारकां’च्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, प्रचारा दरम्यान यांना लोकं गावागावातून हाकलून देतात…तरी, महागाई- बेरोजगारी-अर्धरोजगारीचा आगडोंब उसळला असतानाही, निव्वळ ‘दिड हजारी’ भिकेपोटी, महाराष्ट्रीय जनता यांची एवढी भरभरुन मतांनी ‘ओटी’ भरेल, हे संभवत नाही…इतरे भाषिकांना (बहुशः गुजराथी- भाषिकांना) श्रीमंत करणारा शिवबा-संतांचा भोळसट महाराष्ट्र, कायम गरीब जरुर होता; पण, गुजराथसारखा ‘नीतिशून्य’ आणि यूपी-बिहारसारखा ‘अवलक्षणी- भिकारडा’ कधिच नव्हता… फक्त, तो तसा यापुढे होऊ नये, म्हणून खूपच मेहनतीने नजिकच्या भविष्यात डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागेल.

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!