राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर हे करायचे का?
🛑
लिडर बनना है तो, पहले डिलर बनो!
तुम्ही घरात कमी वेळ व कोर्टात व जेल मध्ये जास्त वेळ राहिले पाहिजे!
तुमच्यावर जेवढ्या जास्त गंभीर गुन्ह्यांच्या केसेस असतील तेवढ्या लवकर समाज तुम्हाला नेतेपद बहाल करेल!
पहिल्यांदा चळवळ, समाजाचे हित, महामानावाचे विचार हे सगळं चुलीत घाला व जाळून टाका!
फक्त आणि फक्त पैसा कमवा तो काळा, गोरा, निळा, पांढरा, हिरवा, भगवा, पिवळा, मटक्यातून, लाँटरीतून, दारुतून, प्लाँट-घरावर कब्जा मारून, सुपारी घेऊन कोणाचा मर्डर करून, खंडणी मागून, करोडपती लोकांचे अपहरण करून, बँकेत दरोडा टाकून, बँकेकडून करोडो रुपयांची कर्ज घेवून व ते न फेडता बुडविलेला असला पाहिजे!
पैसा कसाही असो. फक्त आणि फक्त पैसा कमवा!
कांहीही करून समाजाला लूटा आणि निवडणुकीला उभे रहा! एकदा का तुम्ही निवडून आलात की मग सरकारला लुटा!
अगोदर तुम्ही ज्या लोकांना लुटले ते लोक तुम्हाला शिव्या-शाप देत होते. तुम्हाला खलनायक म्हणत होते. पण एकदा का तुम्ही निवडून आलात तर तेच लोक तुम्हाला नायक, लोकनायक, लोकनेता, शिक्षण महर्षी, विकासरत्न, सहकार महर्षी, कारखानदार महर्षी, साखर सम्राट, दारु महर्षी अशा अनेक पदव्या लोक देतील!
शिव्या देणारे लोक तुम्हाला वरील पदव्या बहाल करतील!
तुमचे मतदार स्वतःच्या लेकरांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. पण तुमचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करतील, रक्तदान शिबीर घेतील, सरकारी दवाखान्यात फळे वाटतील, सामुहिक विवाह सोहळे घेतील, खिचडी वाटतील, वृक्षारोपण करतील, तुमच्या नावाने पुरस्कार देतील, तुम्ही किती महान आहात म्हणून तुमच्यावर पुस्तके लिहतील, तुमचे नाव रस्त्याला, चौकाला, नगराला, शाळेला, काँलेजला देतील!
कारण तुम्ही निवडणूक जिंकून नेते-हिरो झालात म्हणून!
हेच मतदार स्वतःचे माय-बाप मेल्यावर रडणार नाही तेवढे तुम्ही मेल्यावर रडतील.जेव्हा मिडिया रडणाऱ्या व्यक्तीची बाईट घेण्यासाठी येतील तेव्हा तर तो उरबडून रडतील, साहेब मला मानसपुत्र म्हणत होते म्हणून आणखीन जोर-जोरात रडतील
भारताच्या संसदेत, विधानसभेत व विधान परिषदेत असा एक ही लोकप्रतिनिधी नाही ज्यांच्यावर गुन्हा नाही. यात लोकप्रतिनिधीची चुक आहे का?? नाही!!!!!
तर मतदारांचीच तशी मागणी आहे. मतदार चांगले चरित्र असणाऱ्या व्यक्तीला निवडूनच देत नाही. गूंड लोकांनाच मतदार निवडणून देतात!
💙 म्हणून जसे गिऱ्हाईक, तसा माल!
तुम्ही निवडणुकीत उभे राहिल्यानंतर तुमच्याकडे जो अवैध पैसा आहे तो मतदारांना इतक्या मोठ्या प्रमाणात वाटा की एका मताला 1 लाख रुपये वाटायची वेळ आली तरी तुम्ही मागे हटू नका, जेव्हा तुम्ही मतदारांना एका मताला 1 लाख रुपये द्याल तेव्हा मतदार निवडणूक आयोगाला मागणी करेल की दर वर्षाला निवडणूक घ्या. जर निवडणूक आयोग मतदारांची मागणी मान्य करत नसेल तर मतदार-आंदोलन करतील, आमरण उपोषण करतील, तरी निवडणूक आयोग मतदारांचे ऐकत नसेल तर मतदार आत्मदहन करतील!
मतदार आत्मदहन का करेल!!!!
तुम्ही जो मतदारांना मतदान करण्यासाठी 1 लाख रुपये देत आहात ते त्यांना वर्षेभर जीवन जगण्यासाठी उपयोग होईल, त्या पैशातून ते सुखांचा संसार करतील!
💚 शिकून, नौकरी नाही, नौकरी नाही म्हणून छोकरी नाही!
त्यापेक्षा दरवर्षी निवडणूक झाली तर त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न तरी मिटेल!
आशा प्रकारे नेता भी खुश व मतदार पण खूश!
आता मी वरील विचार मांडले त्यांचे तुम्हाला वाईट वाटेल, पण तुमच्या वाईट वाटणाऱ्या मनाला समाजात किंमत 0 आहे!
तुम्ही म्हणाल असं कुठं असतयं का राव! संविधान, लोकशाही जिवंत कशी राहिलं!!!!
संविधान व लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूका घ्याव्या लागतात तेव्हाच लोकशाही, संविधान जिवंत राहील!
देश स्वतंत्र झाल्यापासून अशाच पद्धतीने निवडणूका होत आहेत!
ज्या लोकांना लोकशाही व संविधान जिवंत राहावे असे वाटत असेल त्यांनी गूंड, दरोडेखोर, बलात्कारी, मर्डरधारी लोकप्रतिनिधीचे आभार मानले पाहिजे व पैसे खावून मतदान करणाऱ्या लोकांचे पण हळव्या लोकांनी आभार मानले पाहिजे!
देश स्वातंत्र्य झाल्यापासून गूंड व पैसे खावून मतदान करणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे लोकशाही व संविधान जिवंत ठेवली म्हणून हळव्या लोकांनी आभार मानले पाहिजे!
एकदा नव्हे, तर हजार वेळेस आभार मानले पाहिजे!!!!!
चांगल्या विचारांच्या लोकांनी मनाला वाईट वाटून घेऊ नये, कारण तुम्ही चांगल्या उमेदवारांना निवडून देत नाही, मतदान करायला तुम्ही जात नाही, त्यांचा प्रचार करत नाही, चांगल्या उमेदवारांचे निवडणूकीत डिपाँझिट जप्त झाले की, तुम्ही फक्त हळहळ व्यक्त करता, कोरडा आलाप करता!
आणि निवडणूकीच्या निकालादिवशी [ फक्त 1 दिवस ] हळवे बनता , हळवे बनू नका, वास्तववादी व्हा!
❤️ गूंड व पैसे खावून मतदान करणाऱ्या लोकांनी संविधान व लोकशाही जिवंत ठेवली म्हणून त्यांचे आभार पुन्हा-पुन्हा माना!
लोकशाहीचे चांगभलं!
ना बिबी, ना बच्चा, ना बाप बडा, ना मय्या,
The Whole Things That Sabse Bada Rupaiya
तुमच्याकडे पैसे कमविण्यासाठी 5 वर्ष आहेत, चला मग अंगझाडून कामाला लागा, संसद, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद तुमची वाट पाहत आहे!
बुध्दवंश
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत