दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

२१ नोव्हेंबर महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस. त्यांच्या कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्‍याचा दिवस. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीपुढे झुकावे लागले. या हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर सरकारला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागले. २१ नोव्हेंबर १९५६ ला फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. या निर्णया मुळे मराठी माणूस पेटून उठला होता. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला जात होता. कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोरील चौका कडे कूच करत होता. प्रचंड जनसमुदाय एका बाजुने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजुने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे निघाला. या मोर्चाला उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मात्र, अढळ सत्याग्रहींपुढे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले. १०६ जणांनी आपला प्राण गमवला. त्यानंतर या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र साठी ज्या १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान केले त्या सर्वांना विनम्र अभिवादन.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!