निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

कशी लोकशाहीची थट्टा आज मांडली!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2024
मो.नं. 888818232

नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडले. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असून त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल. *पण, यावेळची निवडणूक लोकशाहीची थट्टा करणारी ठरली. यापुढील होणा-या सर्व निवडणूका लोकशाहीच्या आडून हुकूमशाहीची नांदी ठरणार आहेत. कारण, या निवडणूकीत लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली होती. आदर्श आचारसंहिता फाट्यावर मारुन लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून पाडला जात होता. खुलेआम पैशाचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. राज्य घटनेने प्रत्येक नागरीकाला दिलेला एका मताच्या अधिकाराचा “सौदा” होताना दिसला. धर्माच्या ठेकेदारांनी धर्म दावणीला बांधून धर्माचाही “सौदा” केल्याचे निदर्शनास आले. हॉटेल, ढाब्यावर दारु आणि मटणाच्या ओल्या पार्ट्या रंगल्या होत्या. राजकीय पक्षांचे प्रमुख नेतेच पैसे वाटत असताना रंगेहाथ पकडले गेले. अशाप्रकारे लोकशाहीला रस्त्यावरच विकत घेताना पाहीले.*

विश्वरत्न, घटनातज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद, वंशभेद, गरीब-श्रीमंत या भिंती भेदून, घटनेत तरतूद करुन देशातील प्रत्येक व्यक्तीला “मतदान” करण्याचा बहुमूल्य अधिकार दिला. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाला हे हत्यार दिले. *लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही याला ख-या अर्थाने रुप दिले.* भ्रष्ट, लोकविरोधी सरकार उलथवून टाकण्याची ताकद या *”या एका मताला”* दिली. या एक मतालाच विकत घेण्याचा प्रकार या निवडणूकीत झाला. यापूर्वी गरीब, मध्यमवर्गीय लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांचे मत विकत घेण्याचा प्रकार तर होत होता. *पण या निवडणूकीत प्रत्येक मतदार “होय प्रत्येक मतदारच” स्वतःला विकून घेत होता.* उच्चभ्रू लोकंही पैसे येण्याची वाट पाहत होते. तसेच प्रत्येक कार्यकर्ता पैसे घेतल्याशिवाय निवडणूकीचे काम करत नव्हता. *माझ्या वाट्याचे पैसे जर येत असतील तर ते मी का घेऊ नये अशी भावना कार्यकर्ते आणि मतदारांची झाली होती.* जिथे खासदार, आमदार आणि न्यायही विकत घेता येतो, तिथे सामान्य मतदारांची किंमत ती काय हो?

वर्ष 2014 पासून राजकारणाचे रंगच बदलले आहे. या राजकारण्यांनी गुजरातच्या दावणीला महाराष्ट्र बांधलेला आहे. गुजरातचे अनेक बिलंदर हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करुन परदेशात पळून गेले आहेत, ड्रग्सचे जहाजे गुजरातकडून महाराष्ट्रात येत आहेत, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेले जात आहेत, निवडणूकीत वाटण्यासाठी कंटेनरच्या कंटेनर भरुन पैसा गुजरातवरुन आला आहे. इतकेच नाही तर निवडणूकीत प्रत्येक बूथवर नेमणूक करण्यासाठी स्वयंसेवकही गुजरातवरुन मागविले गेले होते. ही किती भयंकर गोष्ट घडत असतांना आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसण्यापेक्षा काहीही करु शकत नाही. या राजकारण्यांनी पैशाचा अक्षरशः बाजार मांडला असून लोकशाहीला रखेल करुन ठेवली आहे. पैसा, पैसा आणि फक्त पैशाचे अमिषे दाखवून आख्खा महाराष्ट्र नासविण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. *प्रत्येक नागरिकाने धर्माच्या बाहेर येऊन एक भारतीय बनून सत्य स्विकारुन डोळसपणे आपल्या आजूबाजूला पाहिल्यास लोकशाहीचे हे भयानक विदारक दृश्य पहायला मिळेल. हे चित्र बदलायचे असेल तर प्रत्येक भारतीयाला “होय फक्त भारतीयालाच” (कोणत्याही धर्माचे, पक्षाचे लेबल नसलेला एक शुध्द, निखळ भारतीय) शस्त्र हाती घेऊन “रक्तरंजित क्रांती” करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. तरच देश आणि राज्य वाचेल.* तुर्तास इतकेच….. ✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!