रिपब्लिकन बोळवणीचे शिल्पकार शरद पवार
१९९३ मध्ये किल्लारी येथे मोठा भूकंप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेची जगाने दखल घेतली.राञीच्या भूकंपानंतर दिवस उजाडेपर्यंत याठिकाणी शासकीय यंत्रणेने मदतकार्य सुरू केले होते.त्यांच्या या व्यवस्थापन कौशल्याची मदत गुजरात राज्यातील कच्छमध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळीही घेण्यात आली होती.उत्तम प्रशासक म्हणून त्यांचे हे कार्य कोणीही विसरणार नाही.परंतु तत्कालीन मुख्यमंञी म्हणून त्यांच्या बाबतीतील दुसरीही एक सत्यता आहे.ती लपविली जाऊ शकत नाही.ती म्हणजे *१९७८ मधील मराठवाडा नामांतर आंदोलनामुळे उसळलेली दंगल शांत करण्यासाठी त्यांना दहा दिवस लागले. तब्बल दहा दिवस मराठवाड्यातील बौध्द दंगलीच्या आगीत होरपळत होते. नंतरच्या काळात त्यांनी बौध्दांचे राजकारण मोठ्या हिकमतीने संपविले.*
१९९० मध्ये पवारांनी रामदास आठवले यांच्याशी युती केली. त्यांनी आठवले यांच्या रिपब्लिकन गटाला विधानसभा निवडणुकीत १२ जागा दिल्या होत्या.परंतु त्याचवेळी विरोधात १२ बंडखोर उभे करून त्या पाडल्या.याप्रकारचे निरंतर वेगवेगळे डाव खेळून आताच्या परिस्थितीत त्यांनी बौद्धांचे सर्वच नेते संपविले आहेत.
२०२४ च्या विधानसभा सभा निवडणुकीत त्यांनी एक नवीन धुर्त चाल खेळली आहे.अशी खेळी सर्वांगाने तपासणे गरजेचे आहे.पुढील काळात रिपब्लिकनांचे नवे नेतृत्व उदयास येऊ नये.नेते पैदा होऊ नये.म्हणून महत्त्वाच्या राखीव जागांवर कोणत्याही रिपब्लिकन गटांना न विचारता महाआघाडीने जे बौध्द उमेदवार उभे केले, हे त्यांचेच कलाकौशल आहे.एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या त्यांच्या कुटनीतीच्या जाळ्यात काॅंग्रेसही अडकली आहे.विदर्भातील महत्वाच्या जागा घासाघीसीमुळे काॅंग्रेसने उबाठा पक्षाला दिल्या.पूर्वी मेनबत्ती की उदबत्ती अशाप्रकारच्या प्रचाराने मतांचे विभाजन करणाऱ्या या पक्षाने पहिल्या यादीत बौध्द उमेदवार म्हणून सिध्दार्थ देवळे,वाशीम,सिध्दार्थ खरात,मेहकर,राजेश वानखेडे, अंबरनाथ यांना स्थान दिले. तसेच मूर्तिजापूर ची राखीव जागा पवारांनी स्वतच्या पक्ष कडे ठेऊन सम्राट डोंगरदिवे या बौध्द उमेदवाराला दिली. काॅंग्रेसची विदर्भावर नेहमीच भिस्त राहिली आहे.परंतु हक्काच्या राखीव जागा उबाठा आणि पवार यांना देऊन काॅंग्रेसने स्वतःचे महत्त्व विदर्भातून कमी करून घेतले. आणि सदर खेळी काँग्रेस पक्षाचे लक्षात सुद्धा आली नाही. पवार राजकारणातून निवृत्ती घेण्याचे बोलले आहेत.म्हणून जाता जाता त्यांनी जी खेळी केली,त्याचे परिणाम येणाऱ्या काळात अधिकच वाईट होतील.
पवार यांच्या अनेक गोट्या एकाच वेळी खेळण्याच्या सवयीमुळे आरएसएस,भाजपला मोकळ्या जागेत प्यादे उभे करण्याची आयतीच संधी उपलब्ध झाली आहे.आणि ती काॅंग्रेसाठी यापुढे कायम डोकेदुखी राहील. कारण असे प्यादे नेहमीच मते कुजविण्याचे काम करतील.म्हणून बौध्द मतदारांनी सावध झाले पाहिजे.त्यांनी पवारांच्या डावात फसू नये.अशा प्रकारचे भाडोञी उमेदवार पराभूत करावे.पुढेमागे बौध्द नेतृत्व उभे राहील,असा दूरदर्शी प्रयत्न करावा.
पवारांचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे की,ते आपल्या सर्व विरोधकांना पूरून उरले.परंतु ” बौध्द वाटून खा.लुटून खा ” अशी त्यांची आताची खेळी पुढील काळात त्यांच्या अंगावर उलटेल. त्यांची जेष्ठ व सर्वसमावेशक राजकारणी म्हणून असलेली प्रतिमा धुळीस मिळवेल.हे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील लक्षात घेणे, आवश्यक आहे. आणि म्हणूनच असल्या स्वार्थी व अदूरदृष्टीच्या निर्णयामुळे ते प्रतिभा असून सुध्दा भारताचे प्रधानमंत्री होऊ शकले नाही.
जोगेंद्र सरदारे, पञकार
९४२२१३८३२२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत