हा संदेश फक्त त्यांच्या साठीच ..
बाबासाहेबांची चळवळ सुरू झाल्यानंतरची आपली शिकून सावरून थोडीशी स्थिर स्थावर झालेली दुसरीच पिढी.खरं तर हा संदेश फक्त त्यांच्या साठीच ..
आता लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही निवडणुका संपल्या आहेत.आता आपल्याला झालेल्या निवडणुकांमध्ये आपण आंबेडकरी चळवळीशी किती प्रामाणिक राहिलो,बाबासाहेबांची चळवळ कशी मोठी होईल,वाढेल यासाठी आपले योगदान काय आणि प्रस्थापित राजकीय पक्षांच्या झाशांत त्यांनी टाकलेल्या जाळ्यात कसे अडकत गेलो आणि बाबासाहेबांची चळवळ मोठी कशी होईल यापेक्षा ती बदनाम कशी होईल,तिची हानी कशी होईल यासाठी आपला किती हातभार लागला याचे आत्मचिंतन/ विवेचन करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.
बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकीय पक्षाचे झालेले अधःपतन / उडालेली शकले ही प्रस्थापित राजकीय पक्षानी आपल्या पुढाऱ्यांना लावलेल्या गळामुळे आणि ह्या त्यांच्या तावडीत बाळासाहेब आंबेडकर कधीच सापडले नाहीत मग त्यांची बदनामी करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता आणि त्यासाठी आपल्यातील विचारवंत/ निर्भय वाले/ अमिषाला बळी पडलेले पुढारी यांची मदत घेण्यात आली.(वंचितला बदनाम करण्यासाठी जेव्हढा खर्च करण्यात आला असेल तेव्हढा तर आपला संपूर्ण निवडणूक निधीही नसतो शिवाय एकाच जातीच्या भरवशावर निवडणूक जिंकता येत नाही हे तर मनोज जरांगेने सुद्धा एवढा समाज पाठीमागे असून म्हटले आहे.)वाईट त्यांच्याबद्दल वाटत नाही पण आपण सुशिक्षित असून ह्या सर्व गोष्टींना बळी पडतो तेंव्हा भयंकर वेदना होतात.
प्रस्थापित राजकीय पक्षांनी अशाच प्रकारे एकेकाळचा बहुजन समाज पक्ष कसा करून ठेवला ते आपण बघतोच.
ह्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांना काँग्रेसचा पुळका असेल असे मतदारसंघ वजा जाता जेथे शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता तेथे बाळासाहेब आंबेडकर यांनी आव्हान केल्याप्रमाणे समाजाने मतदान करणे आवश्यक होते तसे केले असेल अशी अपेक्षा करूया..
भलेही मतदान केले नसेल पण बाबासाहेबांची चळवळ बदनाम होणार नाही ही काळजी घेतली तर फार होईल…धन्यवाद !!
पुन्हा एकदा सप्रेम जय भीम..🙏🏻
सारंग केदार,मुंबई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत