प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. प्रा.डॉ. उमाकांत राठोड
या देशांमधील राजकीय, समाजव्यवस्था ही जातीच्या आधारावर शोषण करणारी आहे. प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला त्यांचा आवाज बंद करण्याचे काम या प्रस्थापित व्यवस्थेने केले. संत तुकाराम ते कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे उदाहरणे आपल्या समोर आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आधी सभा सदस्य प्रा.डॉ. उमाकांत राठोड यांनी केले. छत्रपती संभाजी नगर मधील सांस्कृतिक चळवळीतील आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते समाधान दहिवाळ यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित सन्मान सोहळा आणि व्याख्यानाच्या निमित्ताने उमाकांत राठोड यांनी आपली मत मांडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कैलास पब्लिकेशनचे प्रकाशक कुंडलिकराव आतकरे हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी भूषविले आपल्या व्याख्यानामध्ये उमाकांत राठोड यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय घेण्याचा अधिकार हा राजकीय व्यवस्थेकडे आहे परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये राजकारणाबद्दल प्रचंड निराशा दिसून येते त्यामुळे राजकीय जागृती निर्माण होणे ही काळाची गरज आहे आणि सर्वसामान्य माणूसच परिवर्तन आणू शकतो त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या निर्णय क्षमतेवर आणि शहाणपणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवला होता आणि सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिलेला आहे. परिवर्तन हे त्यागाशिवाय शक्य नाही त्यामुळे तरुणांनी परिवर्तनवादी चळवळीमध्ये येताना त्यागाची तयारी ठेवावी असे प्रतिपादन उमाकांत राठोड यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आतकरे बापू असे म्हणाले की आज सर्व जाती या शोषणाच्या मधून जात आहे. आणि त्यांचे शोषण होत आहे
म्हणून सर्व जातीमधून आरक्षणाची मागणी समोर येत आहे .अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी लेखक हा दृष्टा असावा तर तो भविष्यव्यता असू नये असे प्रतिपादन केले आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी संपलेल्या आहेत. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि येणाऱ्या काळामध्ये चळवळीने आपला आवाज बुलंद केला पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. याप्रसंगी अजंता प्रकाशानाचे प्रकाशक विनय हातोले ही उपस्थित होते. त्याचबरोबर प्रा. डॉ. शरद बोराडे प्रा. संजय भालेराव यांनी समाधान दहिसर यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संतोष प्रधान ,वाल्मीक वाघ, आकाश प्रधान, गजानन प्रधान, हर्षपाल खाडे ,सोनाजी गवई किशोर होगे यांनी प्रचंड मेहनत घेतली. पुढच्या वर्षीपासून सामाजिक कार्यकर्ते समाधान दहिवाळ व्याख्यानमालेची आयोजन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे. याप्रसंगी समाधान दहिवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत