लोकशाही की पेशवाई ?
समाज माध्यमातून साभार
रात्री दोन वाजता जाग आली आणि महाराष्ट्राची राजकीय दिशा ” हा विषय डोक्यात आला,चिंतन सुरू झाले,ते असे.
महाराष्ट्राच्या इतिहासाकडे जरा नजर गेली,16 व्या शतकात शिवाजी महाराजांनी जुलूम शाही आणि हुकुमशाही विरुद्ध बंड पुकारले (मुस्लिम अथवा इस्लाम धर्माविरुद्ध नव्हे) बलाढ्य हुकूमशहा विरुद्ध गनिमीकावा चे धोरण आणि पराक्रमाची निकराने लढाई लढून हुकुमशाही नष्ट करून स्वराज्य स्थापन केले.त्यास रयतेचे राज्य आणि रयतेचा राजा म्हणून स्वराज्याची ओळख निर्माण केली,आणि महाराष्ट्र प्रांत निर्माण केला.स्वराज्याचे स्वप्न सामाजिक समतेचे,सर्वधर्म समभाव चे,समाजवादाचे, अस्पृश्यता निवारण चे जनतेच्या स्वाभिमानाचे,स्वावलंबनाचे होते,हे सारे तत्व काटेकोर पणे शिवाजी संभाजी महाराजांनी अमलात आणण्याचा प्रयत्न केला.परंतु कालांतराने स्वराज्याचा पंत प्रधान अनाजी पंत आणि सेनापती बाजीराव पेशवा यांनी कटकारस्थाने करून स्वराज्यात पेशवाई निर्माण केली.पेशवाई म्हणजे मुगल साम्राज्या पेक्षाही भयंकर अशी हुकुमशाही होती.कारण मुगलराज्या चे स्वप्न फक्त भौगोलिक एरिया कब्जात ठेवणे” एव्हढेच होते,आणि आर्थिक हितसंबंध जोपासणे पुरतेच होते,परंतु पेशवाईची हुकुमशाही ही या दोन गोष्टी सहित मानवी मूल्य पायदळी तुडवि नारी होती.याचा अर्थ जनतेचे स्वातंत्र्य समता बंधुभाव सामाजिक न्याय ही मूल्य पेशावाईस मान्य नव्हती,म्हणून पेशवाईत मनू स्मृतीचे संविधान अमलात आणल्या गेले,मनूच्या कायद्यानुसार वर्ण व्यवस्था (ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अस्पृश्य) अशी समाज व्यवस्था अर्थ व्यवस्था,व्यवसाय व्यवस्था आणि व्यवसाय नुसार जाती व्यवस्था निर्माण केली,आणि ती अमलात आणली.अस्पृश्यता पण निर्माण केली,जाती उतरंड तयार करून त्यात उच नीचातेची भावना निर्माण केली.वर्चस्वाची,वंश त्वचा अभिमान,जातीचा अभिमान,धर्माचा गर्व ,स्त्रीपुरूष असमानता ही संस्कृती निर्माण केली,यासाठी देवाचा धर्माचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या गेला. बहुजना ना ज्ञान शिक्षण,संपती बाळगण्याचा अधिकार नाकारला, शास्त्र शस्त्राचा पण अधिकार नाकारला.बहुजन म्हणजे sc,st,obc, minorities यांनी फक्त शेती कारखाने यात काम करावे,म्हणजे धान्य आणि वस्तू निर्मितीचे उत्पादनाचे कामे करावीत,ती बाळगता कामा नये,त्यावर मालकी फक्त वरच्या वर्गाची किंवा जतीचीच असेल,अस्पृश्य व स्त्रियांनी फक्त वरच्या वर्गाची सेवाच करावी असे नियम धोरण पेशवाई चे होते,जे शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मोडीत काढले होते,ते परत बाजीराव पेशव्याने पेशवाई या राज्यव्यवस्था म्हणून सुरू केले.हीच पेशवाई म्हणजे हुकुमशाही,बहुजनांची पिळवणूक,विषमता,अंधश्रधा, कर्मकांड,देव धर्माचे स्तोम,स्त्री व दलीत वंचित,इतर धर्मियांना दुय्यम नागरिक व दुय्यम दर्जा देण्याचे धोरण,शिक्षण,कारखाने,शेती,पोलिस,सैन्य,वाहतूक,वीज,पाणी,जंगल,सारे काही खाजगी बलाढ्य उद्योगपतींना देऊन बहुजनांना परत विषमता,पिळवणूक,शिक्षण पासून वंचित,आरक्षण,सामाजिक न्याय पासून वंचित ठेवण्याचे काम आणि धोरण हे आर.एस.एस. आणि त्याची राजकीय शाखा म्हणजे बोजेपी हे परत इथे महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचे काम करताहेत.मतदारांना फुकट राशन,फुकट प्रवास,फुकट तीर्थ यात्रा,लाडकी बहिण भाऊ अशा अनेक योजना काढून,प्रलोभने दाखवून मतदारांची मते मिळवण्याचा खटाटोप चालला आहे. मते घेऊन राज्य करायचे आणि पेशवाई,मनुस्मृती या देशावर लादयची असा बिजीपी डाव आहे.षडयंत्र आहे. एकीकडे संविधानाचा बाबासाहेबांचा,गांधीजींचा,फुले शाहू,शिवाजी महाराजांचा ऊदो उदो करायचा आणि त्यांच्या विचारांची,सिद्धांत धोरण यांची पायमल्ली करायची अशी यांची पाऊले पडताना दिसत आहेत.यांना तिरंगा मान्य नाही. फक्त भगवा झेंडाच हवा आहे,हे एकीकडे सांगतात,आणि त्याच बरोबर तिरंगा घरोघरी म्हणून लोकांना मूर्ख बनवतात. यांना भारत नको हिंदुस्थान हवा, हे सर्वसमावेशक संविधान नको,विषमतावादी मनुस्मृती हवी. हे कधी उघड तर कधी लपून म्हणताहेत. यांना पक्के माहीत आहे की,या 75 वर्षात लोकांना स्वातंत्र्य,लोकशाही,बंधुभाव,सर्वधर्म समभाव,समता ,लोकशाही,समाजवाद,हे सारे अंगवळणी पडले आहे. सहजा सहजी या गोष्टी हे सोडणार नाहीत.फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र या 75 वर्षात घडला आहे. लोकशाही विरोधी पाऊले उचलली,सैन्य पोलिस दलांचा वापर करून जबरदस्तीने इथे हुकुमशाही लादता येणार नाही. असे झाले तर सारी जनता रस्त्यावर उतरेल. बंड पुकारल,श्रीलंका बांगलादेश प्रमाणे जनता पंतप्रधानाच्या कार्यालयात जाऊन त्यास चोप द्यायला पण मागे पुढे पाहणार नाही.या भीतीने तिरंगा झेंडा,संविधान,लोकशाही,मतदान या विरोधी पाऊले उचलण्याची यांची हिम्मत होत नाही.म्हणून यांनी अणाजी पंतची षडयंत्र ची भूमिका घेतली आहे.जनतेला मूर्ख बनवायचे,अंधारात ठेवायचे,फुकट योजना देऊन दुबळे लाचार परावलंबी बेकार भिकारी बनवायचे,त्यांच्या गरिबीचा लाचारीचा पैसे देऊन फायदा उठवायचा.पैस्याने मते विकत घेऊन निवडून येऊन सत्ता कायम हातात ठेऊन,हळूहळू येथील लोकशाही संपवायची आणि महाराष्ट्रात परत एकदा विषमतावादी हुकुमशाही पेशवाई आणायची.हे काम मोदी शहा यांनी देवेंद्र फडणवीस मार्फत बरोबर करून घेत आहेत.भ्रष्टाचारात लिप्त झालेल्यांना जेलची ई डी.ची भीती दाखून त्यांना खोके देऊन विरोधकांची सरकारे फोडणे पाडणे हा धंदा यांनी सुरू केला आहे.संविधानाची शपथ घेऊन ही हे संविधान प्रमाणे वागत नाहीत.याचा अर्थ हे बेमान लोक आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत पेशवाई विरुद्ध महविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस तुतारीची राष्ट्रवादी,मशालची शिवसेना कंबर कसून विरोध करीत आहेत,तर दुसरीकडे या शिवाजी महाराज ,शाहू फुले आंबेडकर चे महाराष्ट्रात परत पेशवाई आणण्याचे काम हे शिंदेचे मिंदे सरकार (उध्दव ठाकरे चे भाषेत) करीत आहे. आताची वेळ आहे,मतदारांनी विचार करायचा आहे की,आपणास पेशवाई हवी की लोकशाही? लोकशाही हवी असल्यास मुख्यमंत्री बहिन-भाऊ ले बळी पडू नये.कारण या योजनेचा पैसा हे मंत्री त्यांच्या खिशातला देत नाहीत,आपलाच पैसा आपणास देतात.एकीकडे प्रचंड महागाई वाड करून,अनेक टॅक्स लाऊन आपल्या खिशातील पैसे काढून घेतात.उजव्या हाताने घेतात व डाव्या हाताने देतात.शेवटी हा आपलाच पैसा आहे. कुणाची आपल्यावर मेहरबानी नाही. एव्हडी जरी मतदार मध्ये जागृती आली तरी बास्स आहे.नक्कीच पेशवाई परत येणार नाही. बहुजनावरील संकट टळेल. याची मला खात्री वाटते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत