निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पैसा.. पैसा… सर्वोत्तम पैसाच !

सुख-दुःखात धावून जाणाऱ्या उमेदवारांवर पश्चातापाची वेळ

राजकारण्यांनी मागच्या पाच। वर्षात जे पेरलं तेच उगवलं

गलिच्छ चित्र पाहून लोकशाही ढसाढसा रडली

बालाजी मारगुडे । बीड

दि.१९ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा सर्वोत्तम पैसाच ठरला आहे. प्रत्येकजण पैसा.. पैसा… पैसाच… मागू लागला आहे. लोकांची दवाखान्याची कामे करा, लोकांची पोलीस ठाण्याची कामे करा, लोकांची सार्वजनिक सुविधांची कामे करा. लोकांच्या प्रश्नावर अंगावर केसेस घ्या…

जेलमध्ये जा… आपल्या घरची सुख दुःख सोडून लोकांच्या सुख दुःखात सहभागी व्हा. लोकांच्या अडल्या नडल्या गरजा भागवा… या सगळ्यांचा उपयोग निवडणूक लागली की शुन्य आहे. जेव्हा कामे करणारा उमेदवार मतदारांच्या दारात मत मागायला जातो तेव्हा हीच लोक उमेदवारांना सरळ प्रश्न करतात ‘नियोजनाचं काय?’ आमच्या गावात मताचा अमूक-तमूक भाव निघालाय. माझ्या एकट्याच्या घरात ७० मतदानंय… असे सांगून लोक लोकशाहीची पूर्णपणे थट्टा उडवताना दिसतायत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. या निवडणुकीत पहिल्यांदाच लोक इतक्या खालच्या थराला जावून वागत आहेत. ही वेळ का आली त्याचं उत्तर विद्यमान आमदारांच्या वागण्यात आहे. त्यांनी सुरत-गुवाहटीची केलेली सहल, पहाटे, दुपारी झालेले शपथविधी यामुळे मतदारांना तरी काय बोलणार? परंतु या सगळ्यांचा फटका पहिल्यांदाच निवडणूक लढविणारे तरूण उमेदवार, गोरगरीब उमेदवार, ज्यांनी मागील पाच वर्षात खरेच नितिमता सोडली नाही, अत्यंत प्रामाणिक राहीले, त्या सगळ्यांना बसत आहे.

विधानसभेनी ही निवडणूक अत्यंत गलिच्छ पध्दतीने पार पड़त आहे. अनेक ठिकाणी सामाजिक समिकरणे आपला ‘रंग’ दाखवताना दिसत आहेत. कधी नव्हे ते या निवडणुकीत विविध जातीचे धर्मगुरू उमेदवारांचा प्रचार करामला भेट ग्यासपीठावर आले होते. त्यातील अनेकांनी तर भाषणे देखील ठोकून दिली. अनेक मतदारसंघात विविध समस्या आहेत. पण या समस्येवर लोकांनीही जाब विचारला नाही आणि वर्षानुवर्षे नेतृत्व करणाऱ्या त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींनाही त्याबद्दल काहीच वाटले नाही, दोघेही खऱ्या अर्थाने बिनलाजे म्हणून या निवडणुकीत बावरले. लोकांनी गावात आलेला उमेदवार गरीब-श्रीमंत काही बघीतले नाही. नियोजन सांगा’ इतकेच लोक बोलत होते. गावातील तरूण

पोरं तर इतकी चहादर निघाली की त्यांनी सगळ्याच पक्षाचे सगळ्याच उमेदवारांचे नियोजन आपल्या पदरात पाडून घेतले. आपले नेते जसे वागत आहेत तसेच गावातील लोकही बागू लागले आहेत. बाप शरद पवारांकडे तर मोठं पोरगं अजित पवारांकडे, मधला पोरगा म्हणतो पाटील म्हणतील तसं. कोणी म्हणत हाकेचा आवाज ऐका… बारका अपक्षाचा प्रचार करतोय. तर चुलता म्हणतो मी पहिल्यापासून भाजपचा माणूस आहे. राजकारणाचा सगळा बाजार मांडून ठेवल्याचे गावोगाव दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार बाबा अंदाज लागणे देखील कठीण होऊन बसले आहे. शेवटी एकच दिसत आहे मागच्या पाच वर्षात राजकारणी लोकांनी जे पेरले तेथ उगवले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चाच नाही

मतदार म्हणजे सगले हतवनीच या शेतकयांच्या प्रश्नावर देखील कुठे ब झाली नाही. अपवाद देवराईत पुजा मोरे या तरूण उमेदकराचा, तिने कापसाचे माय, सोयाबीनचे दर हे मुद्दे जागोजागी नांडले यण तिचा आकाज कितीजणांपर्यंत पोहोला? ज्यांच्यात पोहोचला त्यांच्या हृदयात तो शिरला का? शेती आणि माती हे निवडणूकीतले प्रश्नच राहीले नाहीत. जात, धपे, कटेंगे तो बटेर, या भोवतीच सगळा प्रदार किराला प्रमुख पक्षाध्य उमेदवाराना आपल्या पक्षाचा जाहीरनामा काय? हे देखील माहित नव्हते तो सांगायची गरज देखील कोणाला पहली नाही. कारण लोकांनी जाहीरनाम्यापेक्षा ‘नियोजनात’ गणित विचारलं होत

जातीच्या पलिकडे जावून मदत पण मतदानाला जात महत्वाची

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!