दोन प्रवृत्ती भारतीय उपखंडात हजारो वर्षे आहेत.
पहिली
सत्ता मूठभरांच्या ताब्यात असावी, सत्तेचे लाभ आणि फायदे उच्चवर्णीय समाजाला मिळावेत.त्यासाठी असमानता आणि विषमता कायम राहिली पाहिजे.हा श्रेष्ठ तो कनिष्ठ हा भेद कायम राहिला पाहिजे यासाठी सतत कार्यरत असणारी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह.
दुसरी
संपूर्ण मानवजातीच्या रक्ताचा रंग लाल आहे, सगळी मानवजात एक आहे ,आपण सगळे समान ,समतेच्या पातळीवर आहोत त्यामुळे सत्ता, संपत्ती, प्रगती, शिक्षण या सगळ्यांचा हक्क सगळ्यांना आहे हे सांगणाऱ्या आणि कृतीने आचरणात आणणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह.
साहजिकच दोन्ही परस्परविरोधी आहेत आणि पहिल्या प्रवृत्तीकडे कायमच सत्ता आणि आर्थिक ताकदीच बळ राहिलेलं आहे.
तरीही समानतेची कास धरणारी प्रवृत्ती वेगवेगळ्या माणसांच्या रूपाने वेळोवेळी भारतात जन्मलेली आणि वाढलेली आहे.
समानता मानणारा आणि समानता फायद्याची असणारा, जगण्याची संधी मिळवू पाहणारा बहुजन वर्ग आणि ती नाकारणारा अभिजन वर्ग हा लढा हजारो वर्षे सुरु आहे.
मग समानतेची शिकवण आणि आचरण करणारा व्यक्ती नामोहरम करायला काय केल जात ?
धर्माच्या, जातीच्या ,प्रदेशाच्या नावाने फुट पाडणे.
बदनाम करणे आणि संपवणे.
शरीराने मरूनही माणूस उरलाच तर त्याच चारित्र्यहनन करणे.
तरीही पुरून उरला तर तो मुळात आमचीच शिकवण सांगतो असा भ्रम निर्माण करून त्याच अपहरण करणे.
शेवटची पायरी म्हणजे त्याला देवत्व देऊन ,मखरात बसवून, आरत्या ओवाळून “ हे देवाचे काम, आपल्याला मर्त्य मानवांना अशक्य “ म्हणून त्याच कर्तुत्व नाकारणे.
हा संघर्ष नेमका कळत असेल आणि त्याचा आवाका समजत असेल तर ,
बुद्ध
शिवाजीराजे
राजर्षी शाहू
ज्योतिराव-सावित्रीमाई
बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्र नेमकी कळतात.
बुद्ध विष्णूचा दहावा अवतार कसा होतो,
शिवाजी राजांना देवी तलवार कशी देते आणि त्यांच्या आरत्या, देवळ का होतात,
जेम्स लेन ची हरामखोरी नेमकी कशी होते ,
राजर्षी शाहूंच्या बद्दल पाचकळ विनोद कसे पसरवले जातात ,
ज्योतिराव –सावित्रीमाई एका जातीत कसे बांधले जातात
आणि
बाबासाहेब-हेगडेवार यांची उद्दिष्ट समान कशी सांगितली जातात याची संगती लागते.
आपल्या धडावर आपलच डोक असणाऱ्या लोकांना हा हजारो वर्षांचा लढा कळतो,
ज्यांना कळत नाही ते शिवरायांच्या आरत्या म्हणून शिवराय डोक्यात न घेता डोक्यावर घेऊन बसतात.
तुमचं डोकं आहे ना जागेवर ?
आनंद शितोळे
सीधी_बात
इतिहासाचे_धडे
आपल्याधडावरआपलेच_डोके
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत