मान्यता प्राप्त राजकीय पक्ष होण्यासाठी आवश्यक अटी:
संसदीय लोकशाही प्रक्रियेत मान्यता प्राप्त पक्ष संघटना अत्यंत महत्वाची आहे. केवळ नोंदणीकृत पुरेसे नाही. हजारो पक्ष नोंदणीकृत आहेत. मान्यता प्राप्त होण्यासाठी समर्पित कार्य करावे लागेल.
सध्याच्या नियमाप्रमाणे,
महाराष्ट्र राज्य पातळीवर मान्यता प्राप्त राजकीय पक्ष होण्यासाठी आवश्यक अटी:
१. विधानसभा (एकूण २८८ सदस्य) संख्येच्या ३ टक्के (८.६४) म्हणजे एकूण ९ विधानसभा सदस्य निवडून येणे आवश्यक किंवा
२. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण वैध मतांच्या पैकी किमान ६ टक्के मते तसेच किंमान २ विधानसभा सदस्य निवडून येणे आवश्यक किंवा
३. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण वैध मतांच्या पैकी किमान ६ टक्के मते तसेच किंमान १ लोकसभा सदस्य निवडून येणे आवश्यक किंवा
४. राज्यातील लोकसभेच्या एकूण (४८) जागांच्या प्रत्येक २५ पैकी किमान १ अर्थात महाराष्ट्रातून किमान २ लोकसभा सदस्य निवडून येणे आवश्यक किंवा
५. पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार निवडून येवो अथवा न येवो, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण वैध मतांच्या पैकी किमान ८ टक्के मते आवश्यक किंवा
६. पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार निवडून येवो अथवा न येवो, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण वैध मतांच्या पैकी किमान ८ टक्के मते आवश्यक.
कृपया, कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी सर्वांना पाठवा.
- पी आर सोनवणे
(संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रनिर्माण जन परिषद)
संयोजक, लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत