” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना “
प्रस्ताविक
” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ” लागू झाली,तुम्ही सगळे या योजनेचे लाभधारक बनून लाभ घेत आहात,जरूर घ्या,कारण कोणत्याही पक्षाची सत्ता असो,त्यांनी काढलेली प्रत्येक योजना ही त्यांची स्वतःची त्यांच्यासाठी नसते,तर जनते साठीच असते,म्हणून ती त्यांची नव्हे तर आपल्या हक्काची असते,आपल्यासाठी, आपलीच असते,म्हणून आपला अधिकार असतो.शिवाय आपल्या गरिबीला तो एक आधार असतो,म्हणून अशा योजना घेतल्याचं पाहिजेत,पण अशा फुकटच्या योजना घेताना फारच सतर्क राहिले पाहिजे,अगदी भोळेपणा भाबडेपणा ने अशा योजनांचा लाभ घेऊ नये,तर त्या योजनेमागची कारणे आणि तिचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले पाहिजे,त्यादृष्टीने च आपणास जागृत करण्यासाठी हा लेख लिहिला आहे.
यावर आपण विचार कराल ,ही किमान अपेक्षा.
१. ही एक नक्कल आहे. आपले शेजारी राज्य म्हणजे मध्यप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी ” मुख्यमंत्री लाडकि बहिन योजना “काढली.
निवडणुकी पूर्वी प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे टाकले,त्यामुळे सर्व महिला भगिनींनी बीजेपी पक्षाला म्हणजे कमळाला मते दिली, कमळ फुलले.निवडणूक संपले की योजना बंद केली,तो मुख्यमंत्री वरच्या पायरीवर गेला,देशाचा कृषिमंत्री झाला आणि बहिणी हाती खुरपे घेऊन शेतातील मजूर बनले.अशी ही लाडकी बहीण योजना.हीचेच अनुकरण मुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्रात करीत आहेत,हे लक्षात असू द्या. _
२) अलिबाबा आणि तीन ठग अलिबाबा आणि चाळीस चोर ,नावाची गोष्ट प्रसिद्ध आहे,अलिबाबा हा त्या 40 ठगा चा प्रमुख असतो,त्याप्रमाणे या योजनेत मोदी आणि त्यांचे पिटू दिमाखबाज देवेंद्रभाऊ, अजितभाऊ, एकणाथभाऊ हे तीन ठग मिळून ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ” आणून बीजे पी ची पोळी भाजण्याचे कट कारस्थान करताहेत,हे विसरू नका.
३) भिकाऱ्यांची भिकारी योजना
विरोधी पक्षातील अनुभवी मोठमोठे नेते म्हणताहेत की,सरकारकडे या योजनेसाठी पैसा नाही,आधीच जी एस टी डब्बल टिबल कर जनतेवर लादला आहे,मग या योजनेसाठी करोडो रुपये दरवर्षी लागणार आहेत,ते आणणार कुठून ? अर्थात परदेशी किंवा रिझर्व्ह बँकेकडून कर्ज काढणार .शेवटी ते आपल्याच डोक्यावर असणार,याचा अर्थ एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला कर्ज द्यावे,आणि ते दुसऱ्या भिकाऱ्यानेच फेडावे .अशी ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना _
४. ही योजना नव्हे फसवणूक आहे.
ही एक सरकारी योजना आहे,यासाठी लागणारा सारा पैसा सरकारी तिजोरीतून च मिळणार आहे,शिंदे,पवार फडणवीस आपल्या घरचा थोडाच देणार आहेत ? नाही.तिजोरीत पैसा कसा येतो ? तुमच्या नवऱ्याला दारू पाजून,तुमच्या कुटुंबातील जेव्हढे श्रम करणारे व्यक्ती आहेत ,त्यांच्या घामातून,त्यांच्या श्रमाच्या पैशाची चोरी करून,म्हणजे शोषण पिळवणूक करून,शेतमालाचे भाव कमी करून, खत औषधे बियाणे यांचे भाव वाढवून,महागाई कायम ठेऊन ,तुमच्या पतीना भावना जुगारी व्यसनी बनउन,असा हा पापाचा पैसा पापाची तिजोरी, पापी लोक भारतात,अनेक योजना आखून त्या तिजोरीतून अगदी थोडे आपल्याला देतात मोठे घबाड तेच चोर, लबाड ठग, मंत्री, संत्री, गुत्तेदार, भांडवलदार, मोठाले शेटजी, भटजी, लाटजी नेहमीच लाटतात,त्यातलाच हा प्रकार म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणजे एक फसवणूकच होय. _
५. महिलांना लाचार गुलाम बनविणारी ही योजना
आधीच विषमतेच्या व्यवस्थेची शिकार असलेली स्त्री ही या देशात लिंगभेद असल्यामुळे पुरुषसत्ताक कुटुंबात ती बहीण असली तरी गुलामच आहे,परक्याचे धन आहे.तिचा हक्क अधिकार हिसकावून घेतला गेला आहे,मानवी हक्क अधिकारापासून ती कोसो दूर आहे.शुद्रातील अतिशूद्र अस्पृश्य आहे,अजूनही ती पुरुषापेक्षा शिक्षण, व्यवसाय, संपती, सत्ता, यापासून ती वंचित आहे,असे असताना तिला बहीण म्हणून दरमहा 1500 रू.भिक द्यायची,कामधंदा पासून दूरच ठेवायचे.टाकलेल्या तुकड्यावर अवलंबून ठेवायचे ,पंगू करणारी ही कसली आली योजना? यामुळे ती आत्मविश्वास गमावून बसेल,ऐतखाऊ बनेल,परावलंबी बनेल,दुसऱ्याच्या हाताकडे नेहमीच बघत बसेल,तिच्यातील कर्तुत्वशक्ती नष्ट होईल,ती निर्भय बनाण्याऐवजी भित्री बनेल,स्वाभिमान गमावून बसेल, स्वकर्तृतवावर च विश्वास गमावून बसेल ,पुरुषाची आधीच गुलाम आहे,आता अर्थव्यवस्थेची पण गुलाम बनेल,याची कल्पना राजकरत्याना आहे,तरी स्वार्थासाठी सत्तें साठी यांना कशाचेही कुणाचेही काहीच देणे घेणे नाही.बेजबाबदार ही माणसे,सारा सत्यानाश करायला निघालेत.हे विषमतावादी लोक.म्हणून माझ्या बहिणी नो,योजनेचा लाभ जरूर घ्या ,पण हा गुलामीच्या धोक्या पासून सावध रहा. आळसी बनून भिकारी बनू नका.कामधंदा व्यवसाय करणे सोडू नका.देरे हरी पलंगवरी म्हणू नका. _
६). योजना की निवडणूक नाटक.
ही योजना नव्हे तर निवडणूक जवळ आल्यामुळे महिलांना मूर्ख बनऊन निवडणुकीत केवळ मत घेण्यासाठी बनविण्यात असलेले हे नाटक आहे,
ही शेजारी राज्याची निवडणूक जिंकण्याची नक्कल आहे.म्हणून त्या मुख्यमंत्र्यांनी जसे निवडणूक संपताच ही योजना बंद केली तसेच होणार नाही हे कशा वरून,कारण हे मनभावतून काढलेली योजना नसून दुसऱ्याची नक्कल च आहे.ना भावाला बहिणीचा पुळका आहे,ना गरीब बहिणीला श्रीमंत भावाचा पुळका.केवळ दिखाऊ बहिनभवाचे दिखाऊ हे नाटक आहे.नाटक हे कायम नसते.तीन तासानंतर संपत असते.ते काही काळापुरते सुद्धा नसते,तर थोड्या वेळाचे असते.
७) ही योजना म्हणजे गाजराची पुंगी
पुंगी म्हणजे काय ?
तर वाजली तर वाजली नाही वाजले तर खाऊन टाकली कशी असते जसे योजनाकारांचा हेतू तोच आपलाही असावा कारण त्यांचा हेतू शुद्ध आहे असे म्हणता येत नाही केवळ मते मिळविण्याचा हेतू आहे बहिणीचे प्रेम असता काळजी गरिबी हे सारे ढोंग आहे जसे दादा कोंडके चे गाणे लबाड लांडगा ढोंग करतो भाऊ असल्याचे ढोंग करतो मतावरी डोळा ठेवतो अपेक्षा धरून केलेले प्रेम उपकार हे खोटे असते धोकादायक असते हे विसरता कामा नये
८) आपला पैसा आपला हक्क
बापाच्या प्रॉपर्टीत भावाचा जेवढा हक्क तसाच बहिणीचाही असतो. सरकारी तिजोरी ही जनतेची आहे जनता आपली मायबाप आहे. तिच्यावर आपलाही हक्क आहे ही योजना म्हणजे भीक नव्हे तर आपला हक्क आहे भाऊ भाऊबीज देतो. तो जर त्याच्या कमाईतून देत असेल तर गोष्ट वेगळी पण आपला मुख्यमंत्री भाऊ तर आपल्याच बापाचा म्हणजे आपल्या सगळ्यांचा पैसा आपणास देतो आहे मग याचे उपकार अन प्रेम ते कसले ?भ्रमात राहून चुकीचे मतदान करू नका, चोरून पैसे देणे हे कायद्याने गुन्हा आहे. हे अवघड होत आहे. म्हणून उजागर पणे असे मतासाठी पैसे देणे चालले आहे हे समजून घ्या.
डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले आहे- पैसे घेऊन मत देत असाल तर या देशात परत लोकशाही जाऊन हुकुमशाही येईल, पेशवाई येईल आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक हे सर्व गुलाम होतील. मालक फक्त श्रीमंत भांडवलदार जमीनदारच असतील मग शिक्षण स्वास्थ्य, रोजगार, अन्नसुरक्षेचा अधिकार गमावून बसण्याची पाळी येईल सावधान
वेळ गेली नाही निवडणुकीच्या वेळी आपला हितचिंतक पक्ष कोणता ?हे पाहूनच मतदान करा लाडक्या बहिणीचे पैसे घेतले म्हणून दुष्ट भावास मतदान करू नका कारण तो भटजी, शेठजीचे खाऊन बसला आहे तसेच भटजीच्या बगलेत जाऊन बसला आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे बोल विसरू नका.
आज पर्यंत तुम्हाला या भटजी शेटजीने अनेक वेळा छळले, तुम्हाला या भटजीने रसातळाला नेले म्हणून सावधान व्हा
हाच इशारा
|||||||||||||||||||||||||||||
लेखक:- दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज,
नांदेड
दि. 21 ऑगस्ट 2024
मो. नंबर 9420912209
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे
संविधान तथा २२ प्रतिज्ञा प्रचारक/ प्रसारक सिडको, नांदेड.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत