बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झाले
बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झाले
ते कसले सूर्याचे वारसदार, जे काजव्यांची शिकार झाले,
त्यागून तुमच्या शिलाची श्रीमंती, मेंदु त्यांचे एकदम भिकार झाले.
बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झाले,
,सोडून स्वकियांची संग वैरांच्या दारात चरणारे रेडे टुकार झाले,
वस्तीच्या अवती भोवती फिरणारे लांडगे चिकार झाले.
बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झाले,
तूम्ही उभारलेल्या चळवळीवर डंख मारणारे फुत्कार झाले,
छावणीत शत्रूच्या आजकाल त्यांचा सत्कार चाले.
बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झाले,
ते कसले सूर्याचे वारसदार, जे काजव्यांची शिकार झाले,
त्यागून तुमच्या शिलाची श्रीमंती, मेंदु त्यांचे एकदम भिकार झाले……
नागभूषण बनसोडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत