ह्या निवडणुकीत देखील पोलीस आणि शासकीय कर्मचारी मतदान वंचित ठेवणार का ?
राजेंद्र पातोडे
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक शासकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी ह्यांना मतदान करता आले नव्हते.प्रत्यक्ष जिल्हाधिकारी ह्यांना तक्रार करून सुद्धा त्यावेळी कर्मचारी मतदान वंचित राहिले होते.ह्यावेळी ई डी सी फॉर्म भरून पोलीस कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असून त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने ह्या वर्षी देखील सरकारी कर्मचारी व पोलीस मतदान वंचित ठेवणार का असा सवाल वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी ह्यांना व्हॉट्सअप वर केलेल्या तक्रारी मधून विचारला आहे.
पोलीस कर्मचारी ह्यांना मतदान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.ईडीसी फॉर्म भरून दिले आहेत.मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्थित माहिती दिली जात नाही, बंदोबस्त साठी विविध ठिकाणी तैनाती असल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याचे सांगितले जाते आहे.ही अत्यंत गंभीर बाब आहे.
अकोला लोकसभा निवडणुकीत देखील ईडीसी फॉर्म मिळत नसल्यामुळे बरेचसे शासकीय कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहीले होते.त्यावेळी अकोला मतदारसंघांमध्ये
४०० पोलीस कर्मचारी बंदोबस्त तैनात केले होते. त्यापैकी केवळ १७ पोलिसांचे इडीसी फॉर्म भरले होते.ह्यावेळी इडीसी फॉर्म भरले गेले मात्र यादी मद्ये नाव नाही.जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था नाही, माहिती दिली जात नाही, अश्या आशयाची तक्रार आहे.
जिहाधिकरी ह्यांना निवेदन देवून ह्या बाबत सर्व यंत्रणेला आदेश देवून सर्व पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी कर्मचारी ह्यांचे मतदान करीता तात्काळ व्यवस्था करण्यात यावी.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.ह्याबाबत काय निर्णय घेतला जातो ये रे माझ्या मागल्या प्रमाणे कर्मचारी मतदान वंचित राहणार की त्यांना हक्काचे मतदान करता येणार हे पहावे लागेल.पुन्हा अशी घटना घडण्यास संबंधित अधिकारी कर्मचारी ह्यांचे विरुद्ध निवडणुक आयोगास तक्रार करून कार्यवाहीची मागणी करण्यात येईल.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत