तुळशीचे लग्न-एक समीक्षा
लेखक -श्री.आ.ह.सांळुखे(तात्यासाहेब)
पुस्तक परिचय -स्वप्नजा घाटगे, कोल्हापूर
प्रथम मी तात्यांविषयी थोडंसं सांगते,
डॉ.आ.ह.सांळुखे हे संस्कृत पंडित आहेत.अभ्यासू आणि चिकित्सक व्यक्तिमत्त्व…!
वेदांचा, धर्म ग्रंथाचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचा, ग्रंथाचा योग्य अर्थ लावून पूर्ण सत्य तात्या आपल्या समोर मांडत असतात…
त्यांच्या अनेक अभ्यासू पुस्तकापैकी एक तुळशीचे लग्न-एक समीक्षा हे आहे. अतिशय संतुलित आणि अभ्यासपूर्ण पुस्तक आहे.
उद्या तुलसी विवाह आहे.लोक आपल्या अंगणातील तुळशीचे लग्न विष्णू बरोबर लावून तुळशीचे कन्यादान करतात.
आता आपण मूळ कथा पाहू.
तात्यांनी सदर पुस्तकात सारे पुराव्यानिशी मांडले आहे.
तुळस ही वृंदेचे प्रतिक आहे.वृंदेची कथा शिवपुराण,पद्म पुराण,देव भागवत या ग्रंथात आली आहे.
प्रथम तिला अत्यंत पतिव्रता, सोज्वळ,निर्मळ दाखविण्यात आली आहे.
नंतर नंतर क्रमाक्रमाने काही ग्रंथात तिला वाईट प्रवृत्तीची दाखवत गेले आहेत.
तिचा पती जालंधर अतिशय शूर वीर पराक्रमी आणि शंकराचा वंश असलेला राजा होता.
तो युध्दात देवांचा पराभव करतो.यामुळे देवगण दु:खी होतात.विष्णूसाधुचा वेष धारण करून वृंदेच्या महाली जातो.
कपटाने वृंदेवर बलात्कार करतो.वृंदेला अतिव दु:ख होते.हा अन्याय सहन न होऊन ती स्वतःला पेटवून घेते.
तिच्या रक्षेतून एक रोप निर्माण होते ती तुळस…!!!
मरताना विष्णू ला तू दगड होशील असा शाप देते.विष्णूचे रुपांतर दगडात होते.
तिच्या मृत्यूनंतर जालंधर युद्ध हरतो.
इथं ही कथा संपते.
नंतरच्या पुराणकारांनी यात भर घालून
पुढच्या कपोलकल्पित कथा रचून तिचा विवाह त्या शाळीग्रामरूपी विष्णू शी लावून दिला.आणि एका बलात्कारी व्यक्ती चा गौरव केला.आणि आपणं हा गौरव दरवर्षी करत आहोत.
आपण कधी मूळ ग्रंथ वाचत नाही.कारण ते संस्कृतमध्ये आहे.आपणास जे सांगितले जाते त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवत गेलो आहोत.
आदरणीय तात्यांनी शेवटी असं सांगितलं आहे की आपण तुळशीचे लग्न विष्णू बरोबर दरवर्षी लावतोय.याचा अर्थ आपण विष्णूने केलेल्या बलात्काराचे अजाणतेपणी समर्थन करत आहोत.
मोडून तोडून पुराणातील दुष्कृत्य अशी मुलामा चढवून आपल्या माथी मारली आहेत.बहुजन अशा बऱ्याच अनिष्ट प्रथांचे बळी आहेत.
हे सारे सत्य कळूनही आपण अशा परंपरा जपणारे कसे असू शकतो ??
आपल्या या धडावर आपलेच डोकं आहे ना… कुणाच्या रिमोट कंट्रोलवर आपण चालत आहोत.
मी कालही म्हणाले तसं,
कालच्या पिढीचे पाखंड
आजच्या पिढीची परंपरा बनत आहे
काळजी ती आहे.
बाकी तुम्ही लोकशाहीमध्ये रहात आहात.
तुमच्या धडावर तुमचेच डोकं आहेच…
हे पुस्तक जरूर वाचावे.म्हणजे आणखी तपशीलवार माहिती मिळेल.
स्वप्नजा घाटगे
कोल्हापूर
8888033332✍🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत