सर्वोच्च खंडपिठाने दिलेल्या निर्णया नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील मुलभुत तत्व बदलू शकत नाहीत :- मा ना नितीन गडकरी
नळदुर्ग येथे भाजप महायुतीची जाहीर सभा घेण्यात आली सभेला प्रचंड प्रतिसाद
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासण्यासाठी किंवा लोकशाही बळकट करण्यासाठी निश्चितपणे सर्वोच्च खंडपीठाने दिलेल्या निर्णया नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानातील मुलभुत तत्व कधीच बदलू शकत नाहीत हे आम्ही ठाम पणे सांगतो परंतू कॉग्रेस वाल्यानी भारतीय संविधाना विषयी नागरीकांच्या मनात विष पसरविण्याचे काम करत आहेत आशा भुल थापा मारणाऱ्या कॉग्रेसला चांगलाच धडा शिकवला पाहिजे . कारण
भारतीय राज्य घटनेने दिलेले मुलभुत अधिकार किंवा तत्व आपण कधीच विसरू शकत नाहीत मुलभुत तत्व कोणते सार्वभौम , लोकतंत्र , समाजवाद
धर्मनिरपेक्ष , अभिव्यक्ती हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधांना माध्यमातुन दिलेले अधिकार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते नॉलेजला खुच महत्व आहे जो शिकेल तोच जगेल आशा शब्दात उपदेश बाबासाहेबानी दिले तोच उपदेश भाजप आणि महायुती सरकार त्यांचे तत्व पाळतोय आसे परखड मत भारताचे वाहतूक व परिवहन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले .
नळदुर्ग येथे नुकताच भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या
प्राचारार्थ केंद्रिय मंत्री मा ना नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळेस ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले कोणत्या महापुरुषाला जात होती कोणत्या संताला किंवा पंथाला जात होती कोणत्या धर्मात जात होती का मग कशा करिता जातीचे राजकारण करू पाहाताय आशा जातीच्या समीकरणाला भाजप महायुतीने कधीच मुठमाती दिली आहे . शिवाय तुळजापूर ते नळदुर्ग हायवे रोडला चौवपदरी करणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आसुन निवडणूक संपताच या कामाला सुरुवात घेणार आहे . या भाजप महायूती च्या काळात रस्ते विकास जोडणी प्रकल्प संपुर्ण देशात राबविण्यात आला जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला शिवाय माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आशा अनेक योजना राबवित भारत देश सुजलाम सुफलाम करायचा आहे त्यासाठी मतदारांच्या सकारात्मक प्रतिसाद मिळाला पाहिजे महायुतीचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आहेत यांना भरभरून आशिर्वाद देऊन प्रचंड मतानी विजयी कराल आशी आपेक्षा करतो आसे म्हणाले .
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, नेते सुनिल मालक चव्हाण , भाजपाचे नेते नितीनजी काळे , यूवा नेते मल्हार पाटील , भाजपाचे धाराशिव , जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य , गणेश सोनटक्के , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे , रि पा इं चे नेते राजाभाऊ ओव्हाळ , गोकुळ तात्या शिंदे , शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके , भाजपाचे नेते संतोष बोबडे , रि पा इं चे बाबासाहेब बनसोडे , रि पा इंचे एस के गायकवाड , लहुजी शक्तीसेनेचे शिवाजी गायकवाड , नप चे माजी उपाध्यक्ष शफी भाई शेख , सज्जनराव साळुंके , भिमा इंगोले ,प्रभाकर मुळे , मिलींद पाटील ,विनायक अहंकारी , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास गुरुजी कांबळे , विक्रम देशमुख , निहाल काझी , धनंजय शिंगाडे , भाजपचे नेते सुशांत भुमकर , माजी प्रभारी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे , माजी नगरसेवक सुधिर हजारे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , शहराध्यक्ष धिमाजी घुगे , यूवा नेते पद्माकर घोडके , सागर हजारे , यूवा नेते बबन चौधरी , संजय बताले , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव वडगावे , दिपक घोडके सचिन पाटील , नारायण नन्नवरे , विक्रम देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काका धुरगुडे , श्रमिक पोतदार , सह हजारो नागरिक जाहीर सभेला उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत