नको पैसा, नको दारू, नको मटण दाबू संविधान, लोकशाही रक्षण व विकास करणाऱ्याचे बटण –
प्रा. देविदास इंगळे
भारतीय संविधानाने आपणास जगातील सर्वात मोठी लोकशाही दिली यासाठी की भिकारी सुद्धा राजा होईल परंतु आपण त्याऐवजी निवडणुकीत भीक मागतोय दारूची, मटणाची, पैशाची यामुळे निवडणुकीत उभा असलेला उमेदवार त्यावरतीच फोकस करतोय यांना विकासाचं काहीही देणं घेणं नाही हे फक्त दारू, मटणावरती आणि 1000-500 वरती विकले जाणारे आहेत.
उमेदवार दारू, मटण, पैसा 500-1000 पुरवतीलही परंतु हेच निवडून आलेले उमेदवार हा पैसा कुठून काढतील याचा जर विचार केला तर ते केवळ आणि केवळ झालेला खर्च काढण्यात आणि पुढच्या निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यात मस्गुल राहतील म्हणून जास्तीत जास्त पैसा कसा जमा करता येईल याकडे लक्ष असेल मग कोणतेही काम थातुरमातुर करून कोणत्याही मार्गाने केवळ माया (पैसा )गोळा करण्याकडे त्यांचा कल असेल.
याचाच अर्थ असा होतो की ज्याच्याकडे पैसा त्यानेच निवडणूक लढवावी मग कुठे आहे संविधानाचे मूल्य न्याय,समता ही तर गरीब-श्रीमंत विषमता जिसकी लाठी उसकी भैस ही राजेशाही, ही हुकूमशाही, कुठे आहे लोकशाही?
आज लोकशाहीत शिक्षण विकत मिळते, आरोग्य सुविधा विकत मिळतात, नौकऱ्या विकत मिळतात मग यावरती लक्ष कोणी द्यायचं? याला आळा कोणी घालायचा? याला जबाबदार कोण?
याला जबाबदार जनता आहे जनतेनी निवडणुकीत एकही रुपया न घेता दारू, मटण न घेता येणाऱ्या उमेदवाला
आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मोफत , आरोग्य सुविधा मोफत, युवकांना रोजगार, शेतकऱ्यांनी ऊन, पाऊस, थंडी सोसून केलेल्या कष्टचा मोबदला म्हणजेच शेती मालाला योग्य भाव याकडे लक्ष केंद्रित करावे आणि भ्रष्टाचार निर्मूलनास आपल्यापासून सुरुवात करावी.
आणि संविधान, लोकशाही टिकविण्यास मदत करावी.
ही विनंती.
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
संचालक – दिवंगत द्रौपदाबाई बहुउदयशीय सेवाभावी संस्था ताकबीड ता. नायगाव जि. नांदेड
अध्यक्ष
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत