महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांचे शोषण कर्ते कोण ?
शरद चंद्र जी पवार साहेब सहकाराचे पाठीराखे की स्वाहाकाराचे निर्माते?
••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
स्व यशवंत राव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात सहकार धोरण आणले आणि केंद्रीय सरकारचे निधीतून व सभासदांच्या शेअर मधून साखर कारखाने , आणि तत्सम सहकारी संस्था उभ्या राहिल्या
मूलतः शेतकरी असलेल्या गरीब मराठा , कुणबी व इतर शेतकरी समूहाचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि मुंबई , पुणे हैदराबाद आदी शहराकडे जाणारे लोंढे रोखले जावेत हा यामागे हेतू होता .
1960ते 1978पर्यंत हा सहकार खऱ्या अर्थाने फुलला , बहरला
1978साली पुलोद सरकार आले आणि पवार साहेब मुख्यमंत्री बनले .
महाराष्ट्रात 3 प्रमुख सहकारी संस्था आहेत
1),,,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
(शिखर बँक) जी 31 जिल्हा मध्यवर्ती बँका ना वित्तपुरवठा करते , जिल्हा बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 40,000खेड्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो एका अर्थाने राज्याची ती आर्थिक नाडी आहे
2),,,,महाराष्ट्र राज्य साखर संघ
3),,,, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट
या तिन्ही संस्था वर पवार साहेब यांचा ताबा आला .
1980साली सरकार आल्या नंतर ठरवून सहकारी संस्था आजारी पाडण्यात आल्या ,
त्यावरील उपाययोजना साठी 4 कमिट्या राज्य पातळीवर स्थापित झाल्या , परंतु एका ही कमिटी चे शिफारशी वर काम केले गेले नाही ,
केंद्र सरकारने 5 कमिट्या नेमल्या त्यांच्या ही शिफारशी आधारे काम झाले नाही .
सहकारी कारखानदारी मोडीत काढून कुटुंबातील सदस्य , पक्षातील जवळचे नेते यांच्या नावाने कारखाने करून महाराष्ट्रात स्वतः चे साम्राज्य निर्माण करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले .
50 सहकारी साखर कारखाने , 30ते 35लाख कर्मचारी असलेले व त्यांच्या क्षेत्रात ऊस व मुबलक पाणी अशी आबादी आबाद परिस्थिती असताना
सरफेशी कायद्याचा वापर करून विक्री दाखवली गेली
*माझे मूळ गावचे रहिवासी माजी आमदार माणिक राव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार
पुणे जिल्ह्यातील दौंड सहकारी साखर कारखाना निर्मिती साठी शासनाने 167एकर गायरान जमीन दिली , 15लाख शेअर्स राज्य सरकारने दिले , शेतकऱ्यांनी ही दिले , हा कारखाना चालू शकत नाही अशी सबब पुढे करून त्याचे खाजगीकरण “दौंड प्रा ली केले गेले , तो कारखाना 7, 000 टनाचा , वीरधवल जगदाळे यांचे माध्यमातून अजित दादा चालवत आहेत .
छ्त्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील
“कन्नड”सहकारी साखर कारखाना “बारामती ऍग्रो ( आप्पासाहेब पवार) यांचे पुत्र राजेंद्र पवार यांनी नाम मात्र किमतीत स्वतः चे घशात घातला .
“बारामती ऍग्रो चे पार्टनर आ रोहित , ना अजित दादा , राजेंद्र पवार आहेत
याच राजेंद्र पवार यांनी नगर जिल्ह्यातील “जगदंबा “सहकारीचा “खाजगी “करून घेतला
नंदुरबार जिल्ह्यातील पुष्पजगदेश्र्वर व सातारा जिल्ह्यातील डॉ शालिनी ताई पाटील यांचा जरडेश्र्वर सह सा कारखाना ही खाजगी करून पवार घराण्याच्या ताब्यात आला
अजित दादा यांनी 13साखर कारखाने सहकाराची मोडतोड करून खाजगी मालकीचे केले.
या साठी जी कार्य प्रणाली वापरली गेली , त्या नुसार
सहकारी साखर कारखान्यास वेळेवर वित्तपुरवठा न करणे ,
सरकारी थक हमी न देणे
संचालक मंडळाची थक हमी नाही अश्या कारखान्यांना कर्जे द्यायची
आणि वसुली नाही म्हणून जप्त करायचे .
या सर्व कटाच्या विरोधात मुंबई हाय कोर्टात “अरोरा” यांचे मार्फत तीन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या ,
यातून नाबार्ड चां अहवाल समोर आला 25हजार कोटी ठेव असलेली बँक का डब घाईस आली या चौकशी साठी मोर्चे काढले गेले ,
डॉ शालिनी ताई पाटील
मा आमदार माणिकराव जाधव
अण्णा हजारे
यांनी हा प्रश्न सातत्याने ऐरणीवर आणला ,
2009/10नाबार्ड रिपोर्ट , कॅग रिपोर्ट , ऑडिट रिपोर्ट असल्याने पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हे राज्य बँक प्रकरण रिझर्व्ह बँकेला पाठवून दिले
रिझर्व्ह बँकेने 7मे 2011रोजी संचालक मंडळ बरखास्त केले ,
राज्य सरकार ने सहकार कायदा कलम 83/88अन्वये चौकशी केली
या चौकशीत हे संचालक मंडळ
दोषी ठरले व त्यांच्यावर 1079कोटी ची जबाबदारी नीच्छित केली गेली
50सहकारी साखर कारखाने खाजगी कसे झाले ? याची केस व त्याची प्रदीर्घ सुनावणी झाली
धर्माधिकारी व शिंदे साहेब यांनी सर्व पुरावे पाहिले
आणि 22ऑगस्ट 2019 रोजी उच्च न्यायालयाने 84 पानी निकाल दिला
यातील पान क्रमांक 67/68वर शरद पवार हे मुख्य सूत्रधार असून कर्ज वाटप करताना त्यांचे अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे सांगून त्यांचे विरोधात 120ब व 109 प्रमाणे गुन्हा नोंद करून चौकशी करण्याचे आदेश दिले
सुप्रीम कोर्ट अपिलात ही हा निकाल अभ्यासपूर्ण असल्याचे म्हंटले गेले .
अजित दादा यांनी बँकेच्या ठेवी 12000कोटीच्या असताना 25000कोटीचा घोटाळा कसा? यावर विश्लेषण करताना
माजी आ माणिकराव जाधव यांनी सांगितले की
50 साखर कारखाने ,
त्यांच्या मालकीची 10,000एकर जमीन
कारखान्याच्या 2500कोटी ठेवी
शेतकऱ्यांच्या शेअर्स ची किंमत 1700कोटी
राज्य सरकारचे 1200कोटी चे शेअर्स
कामगाराचे 1100 कोटी चे थकीत वेतन
हे सर्व बुडलेले आहे .
31पैकी 25जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडलेल्या आहेत
235 सहकारी सूत गिरण्या पैकी
185 सुत गिरण्या विक्री झालेल्या आहेत , यातील घोटाळा अजून उघड व्हायचा आहे
हा सर्व घोटाळा 1लाख कोटी चां आहे ,
फक्त जातीचे भांडवल करून “मराठा कार्ड” वापरून याच पैशातून महाराष्ट्रातील बुद्धिवंत , लेखक , कवी , साहित्यिक , मीडिया वापरून आपणच महाराष्ट्राचा स्वाभिमान , आणि शिव शाहू फुले यांचे वैचारिक वारसदार म्हणवून घेऊन खोटी उदात्त प्रतिमा निर्माण केल्या ने , व या प्रतिमेत सामान्य लोक मतदार हरवून जावे म्हणून ऐतिहासिक वाद उकरून काढून त्याला ब्राम्हण ब्राम्हणेतर विचाराची जोड देणारे मासिहा ठरलेले आहेत ,
पक्ष फोडला , गद्दार म्हणून इतरांना टार्गेट करून बदनामी करणाऱ्या या राज्य कर्त्यानी महाराष्ट्र व्यक्तिगत उन्नत्ती साठी लुटला ,,
पण सर्व सामान्य माणसांना याची चीड येत नाही , तो पर्यंत हा स्वाहाकार राजरोसपणे चालत राहील
लुटारू नेत्यांना लोक देव समजत राहतील , आणि स्वतः चे जगणे
असहय झाले म्हणून हजारो शेतकरी आत्महत्या करत राहतील ,,
जनतेने ठरवायचे आहे
पवार घराणे सहकाराचे पाठीराखे की
स्वाहाकाराचे निर्माते ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत