निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी बाबत आक्षेपहार्य पोस्ट टाकणाऱ्या पेज वर दोन दिवसांत गुन्हे दाखल करून कार्यवाही न केल्यास अकोला जिल्हा जाम करण्याचा वंचित युवा आघाडी चा इशारा

अकोला दि. 12
बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी बाबत आक्षेपहार्य पोस्ट टाकणाऱ्या पेज वर तातडीने गुन्हे दाखल करून कार्यवाही न केल्यास अकोला जिल्हा जाम करण्याचा इशारा वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी सिव्हील लाईन ठाणेदार जयवंत सातव ह्यांना दिला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बाळासाहेब आंबेडकर यांचे विरोधात बदनामी करणारी पोस्ट आल्याने युवा आघाडी पदाधिकारी ह्यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन वर धाव घेतली. विधानसभा निवडणूक सुरू आहे.आदर्श आचार संहिता सुरू असताना आज दिनांक १२/११/२०२४ रोजी पाच तासा पूर्वी Rajkiy Dhurala राजकीय धुराळा ह्या पेज वर एक पोस्ट टाकण्यात आली आहे.
त्यामध्ये ‘ वारंवार भूमिका बदलायची अन् नाही नाही म्हणता अलगद पाठिंबा द्यायचा….!
अश्या आशयाची पोस्ट करून
त्यात बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा फोटो टाकून सदर पोस्टरवर
“ज्यांना मतदान द्यायचं त्यांनी भाजपा युतीला द्यावं, काँग्रेस आघाडीला देऊ नये, ज्यांना नसेल द्यायचं त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं आणि नुसतं मतदान न देता आमदार निवडून द्यावेत.

– प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीला ‘B टीम’ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं..?”

अशी मतदारांची दिशाभूल करणारी तसेच वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जनतेच्या मनात द्वेष पसरवून त्यांची बदनामी करणारी पोस्ट करण्यात आली आहे.
त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे.
https://www.facebook.com/share/1X81HXE8Fb/

निवडणुकीत गैरप्रकार करून, खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. दलित आणि बहुजन समूहात जातीय दंगल घडविणे, निवडणुक प्रक्रियेत बाधा निर्माण करून एका विशिष्ट राजकीय पक्षाला राजकीय फायदा व्हावा अश्या पद्धतीने सदर पोस्ट करण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट असून अश्या पद्धतीने विषारी प्रचार करून आंबेडकरी नेतृत्वाची तसेच आंबेडकरी, बहुजन मतदार ह्यांची बदनामी करून त्यामधून बाळासाहेब आंबेडकर भाजपचे समर्थक असल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करण्यात येत आहे.ह्या पोस्ट मुळे महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक वातावरण मधे तेढ निर्माण करण्यात आली आहे.त्याचा परिणाम राज्यातील निवडणुक प्रक्रिया बाधित करून वंचित बहुजन आघाडी विरुद्ध खोटी आणि खोडसाळ माहिती टाकली जात आहे. सबब कधीही राज्याची शांतता सुव्यवस्था बिघडू शकते.
करीता सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन ला
तक्रार करण्यात येते की, सदर पेज एडमीन ह्यांचे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी
अन्यथा
अकोला जिल्हाभर चक्का जाम करण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी ने दिला
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,
जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,
राजकुमार दामोदर,
तक्रारकर्ता जय रामा तायडे (माजी युवा आघाडी महानगर अध्यक्ष ),
शहर अध्यक्ष वैभव खडसे,
तालुका अध्यक्ष मिलिंद इंगळे,
सचिन शिराळे, छोटू यादव, आकाश गवई, आकाश जंजाळ, आनंद खंडारे, नागेश उमाळे, राजेश बोदळे, निकी डोंगरे बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष,सुरज दामोदर, सम्राट तायडे पातूर तालुका अध्यक्ष,सुनिल शिरसाठ, राहुल बामने, आकाश चक्रे, धम्मपाल तायडे, अनिकेत सावळे, राज डोळे, अजय अंभोरे, आकाश वानखडे, शंतनू तायडे, सागर मेश्राम, तुषार सोनोने, स्वप्निल गवई, दीपक वाघ, मयूर चक्रनारायण,

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!