नवीन पिढीला ही सुरवात समजल की नाही माहिती नाही.

प्रिय ,
दादा / काका / मामा…
सप्रेम नमस्कार/जय शिवराय/ जयभीम/ जय मूलनिवासी/
वि. वि.
व्हाट्सएपच्या काळात पत्र लेखन बंद झाल आहे. त्यामुळे आपल्या सारख्या जुन्या लोकांना पत्राची सुरवात वाचल्यावर पोस्ट कार्डची आठवण झाली असेल.
नवीन पिढीला ही सुरवात समजल की नाही माहिती नाही.
इकडील सर्व सध्या तरी ठीक आहे…तिकडची ख्याली खुशाली तुम्ही कळवत नाही…ते जाऊ दे…
आज मला तुमच्याशी खूप गंभीर विषयावर बोलायच आहे, माझं काही सांगणं आहे.
ह्या राज्य अन केंद्र सरकारन राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या नावाखाली आपल प्राथमिक शिक्षण ते कॉलेज पर्यंतच सर्वच शिक्षण बंद करण्याच ठरवल आहे व त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
तस गेली १० वर्ष सरकारने शिक्षक भरती केली नाही. त्याचा परिणाम म्हणजे १४०५ पैकी १२५० डी. एड. कॉलेजला कुलूप लागल आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील सरकारी शाळेतील ३० % पेक्षा जास्त शिक्षक संख्या कमी झाली आहे व येत्या १० ते १५ वर्षात शाळा आणि शिक्षक वर्गच नष्ट होणार आहे.
आता उद्या येणाऱ्या जून महिन्यात सरकारी ६५६३९ पैकी १४७८३ शाळा बंद होऊन २५ ते ३० हजार शिक्षक अतिरिक्त होऊन घरी बसणार आहेत. उर्वरीत शाळा लवकरच दत्तक योजनेच्या नावाखाली विकण्याचा निर्णय झाला आहे.
शिक्षकांना/कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन सरकारने बंद केली आहे… वर्तमान आणि भविष्यात जगणं लय अवघड केलय त्यांनी.
२०३० पर्यंत भारतातील ४० हजार महाविद्यालया पैकी २५ हजार महाविद्यालय बंद होऊन उरलेली १५ हजार महाविद्यालय उद्योगपतीला विकली जाणार आहेत.
सर्वच क्षेत्रातील नोकऱ्यांचे खाजगीकरण होऊन ठेकेदार नियुक्त केले आहेत व त्यातून नोकरी मिळत नाही तर ११ महिन्यासाठी मालकाच्या मर्जीवर तुटपुंजा रोजगार मिळत आहे ज्यात काही भागत नाही.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी सुरु केलेली शिक्षणाची चळवळ , तिला राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला राजाश्रय व बाबासाहेबांनी दिलेल घटनात्मक कवच गळून पडलं आहे.
तुमच , माझ व आपल्या पुढील हजार पिढ्यांच भविष्य उध्वस्त करण्याच कारस्थान त्यांनी शिजवलं आहे.
पुन्हा कोणी शिव,फुले ,शाहू , आंबेडकर जन्माला येणार नाही याची पुरेपूर खात्री मला आहे.
आता मला गप्पं बसवत नाही …मी माझ्या कुटुंबा सोबत २५ फेब्रुवारी ला दुपारी ३ वाजता शाळा वाचवा , शिक्षण वाचवा , शिक्षक वाचवा या मेळाव्याला सहभागी होण्यासाठी मुंबईत BKC मैदानावर येत आहे.
मला वाटतं की मला जी पुढच्या पिढी बद्दल तळमळ आहे तीच तळमळ तुलाही असल. मला जे शिव, फुले , शाहू , आंबेडकरांच्या उपकारतून थोडे उतराई व्हायचे आहे असे तुला ही वाटत असल.
मला वाटतं तुझ्या-माझ्या आणि लेकरांच्या भवितव्याचं जर तुला काही वाटत नसेल तर आपल्या नात्याला काय अर्थ उरतो…माझी तुला हात जोडून विनंती आहे की मेळाव्याला आपली घरातली सगळीच माणसं घेऊन तुम्ही यायचं आहे…आपली भेट तिथ नक्कीच होईल. पण तुम्ही नाही आला तर मी तुम्हाला मेलो आहे असं समजावं लागल आणि नाईलाजने तुम्ही माझे कोणी नाहीत असं मला मानावं लागल हे निर्वाणीच सांगतो. बाकी तब्बेतीची काळजी घ्या. जास्त फाफट पसारा लिहीत नाही.नक्की या !
वडीलधाऱ्यांना शि. सा. द. लहानांना खूप खूप आशीर्वाद.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत