महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- ६/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — २६
मान आणि अपमान
मान = मान म्हणजे अहंकार; स्वतः बद्दलचा वृथा अभिमान. घमेंड; गर्व अशा प्रकारची प्रवृत्ती.
काही लोकांची प्रवृत्ती अशी असते की; इतर लोकांमध्ये मीच श्रेष्ठ आहे.मलाच सगळे कळते. माझ्या शीवाय कोणीच मोठा नाही.या मी पणातून अशी लोक हे इतरांबरोबर तुसडे पणाने वागत असतात.इतरांना कस्पटासमान समजत असतात.इतरांचा आदर करत नाहीत.नेहमी इतरांचा पाणउतारा करत असतात. म्हणजे हे लोक एक प्रकारे हुकुमशहा असतात.
असे लोक स्तूतीसाठी ; सन्मानासाठी हापापलेले असतात.यांना सर्वांनी येताजाता सलाम करावा. साहेब साहेब म्हणावे अशी प्रवृत्ती असते. असे लोक एखाद्या संघटनेत असतील तर तिचे बारा लवकरच वाजले म्हणून समजावे. मान ही प्रवृत्ती नकारात्मक आहे. ती स्वतः मध्ये व इतरांमध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण करत असतात.अशा मानी अहंकारी माणसापासून लोक चार हात दूर राहणेच पसंत करतात.या अहंकारी; मानी लोकांमुळे समाजाच्या ऐक्याला तडा जातो.हे लोक हटवादी असतात.हेकेखोर असतात.
काही लोकांना आपण किती खतरणाक आहोत याचा गर्व; अहंकार असतो. असे लोक स्वतः स्वतःच्या वाईटपणाचा दिंडोरा पिटून सांगत असतात की मी किती खतरणाक आहे.म्हणजे मी खतरणाक आहे याचा काही लोकांना गर्व; मान असतो.ही प्रवृत्ती काही लोकांमध्ये असते ही बाब फारच गंभीर आहे.म्हणजे लोकांमध्ये कसा चुकीचा अहंकार असतो हे यावरून लक्षात येईल.खरेतर अशा लोकांचे ते अज्ञान आहे.
काही लोकांना पुढील गोष्टींचा अहंकार असतो. संपत्ती ( घरदार; जमीन जुमला; दाग-दागिने;गाडया ; कपडेलत्ते); शिक्षणाचा ( अनेक पदव्यांचा) ; सौंदर्याचा; पद; प्रतिष्ठा; अधिकार; सत्ता; ज्ञानाचा ; शक्तीचा इत्यादी गोष्टींचा अहंकार असतो.
भारतात महाभयंकर अहंकाराचा रोग कोणता असेल तर तो जातीवादाचा.उच्च जातीचे लोक कनिष्ठ जातीच्या लोकांचा जातीच्या श्रेष्ठत्वामूळे द्वेष करतात. कधी कधी आपण आपल्या गावचा आहे म्हणून आपुलकीने चौकशी करतो की ; सध्या रहायला कुठे असता.तर आपल्या समोर उच्च जातीची व्यक्ती असते.तिचे उत्तर येते.कामाच काय ते बोला.हा जो प्रतिसाद आहे.तो जातीच्या अहंकारातून आलेला आहे हे लक्षात येते. या जातीय अहंकाराचा परिणाम या देशातील राजकारण; समाजकारण; शिक्षण व्यवस्था; शासकीय कार्यालये;शहर; गावोगावी सतत बऱ्याच जणांना अनुभव येत असतो. जातीय अहंकार असलेली माणसं दुसऱ्यांचा अपमान करत असतात.
म्हणून माणसाने सन्मानाने जगायला शिकले पाहिजे. आपल्यात नम्रता; विनयशीलता निर्माण केली पाहिजे.अहंकार सोडून सर्वांबरोबर समतेने; ममतेने वागले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा स्वाभिमानी असतो.म्हणजे नितीवान माणूस हा ताटमानेने जगत असतो.प्रत्येकाचे एक अस्तीत्व असते.ते प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे.
अपमान = अहंकारी माणस ही दुसऱ्यांचा सतत अपमान करत असतात. मानहानी करत असतात. कोणी चुकला तर काही अजागृत अहंकारी माणस एखाद्याचा चारचौघात अपमान करत असतात.काही लोकांचा स्वभावच असतो की; दुसऱ्यांचा अपमान करणे. ते लोक अशा वागण्यातून असुरी आनंद घेत असतात. अपमाणातून सुडाच्या भावनेचा जन्म होतो.सुडाला पेटलेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. काही माणसांना अपमान सहन होत नाही.परंतू परिस्थिती नुसार गप्प बसावे लागते.पण हे लोक मनात अपमानाचे शल्य घेऊनच जगत असतात. अपमान हा मानसा माणसांमध्ये कलह निर्माण होणारी बाब आहे.अपमान ही मनाला दुःख देणारी बाब आहे. अपमानामुळे बरेचजण एकमेकांचे तोंड सुद्धा पहात नाहीत.अपमानामुळे माणूस बरेच काही उद्धवस्त करू शकतो.मग ते कुटुंब असो.संस्था; संघटना असो. पक्ष असो. सारं काही उद्धवस्त करून टाकण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अपमानाच्या या विषापासून मानव जातीचे रक्षण केले पाहिजे. कोणी कोणाचा अपमान न करो.अशी मानसिक अवस्था निर्माण केली पाहिजे.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत