दिन विशेषनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आटपाडीच्या साखर कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार…….माजी मंत्री जयंतराव पाटील


भाजपने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्पॉन्सर करून बंडखो-या करायला लावल्या आहेत पण आटपाडीच्या साखर कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार कुणी कसे वागायचे तसे वागा. खानापूर आटपाडीच्या विकासासाठी कर्तृत्ववान मा.वैभव दादा पाटील हा नवा चेहरा दिला आहे सर्व जनतेने त्याच्या पाठीशी ताकद उभी करा असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले.
खानापूर येथील विधानसभा 2024 च्या महाविकास आघाडीचे उमेदवार मा. वैभव दादा पाटील त्यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक, माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, पक्षनिरीक्षक हायमू सावनुरकर, देवराज पाटील, अरुण माने,आटपाडीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, किसन जानकर उपस्थित होते.
पाटील साहेब पुढे म्हणाले की, खानापूर आटपाडी मधील शेतकऱ्यांसाठी 2019 – 20 मध्ये मी मंत्री असताना सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली आहे. महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर…

1) कुटुंब रक्षण योजनेत 25 लाख ₹ पर्यंत आरोग्य विमा.

2) मुली महिलांसाठी मोफत बस सेवा.

3) युवकांना प्रतिमहीना 4000 ₹.

4) महिलांसाठी महालक्ष्मी योजना. प्रतिमहिना 3000₹ देणार.

5) राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख ₹ पर्यंत चे कर्ज माफ. आमचे सरकार आल्यानंतर हे आम्ही देणार आहोत. म्हैसाळ, टेंभू या जलसिंचन योजनासाठी मी मंत्री असताना 14 टीएमसी पाणी उपलब्ध करून सांगली जिल्ह्यातील 109 गावांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील एखादे दुसरे अभावाने गाव राहील.
शिवाजी विद्यापीठाचे खानापूरला उपकेंद्र करण्यासाठी.मा माननीय वैभव दादा पाटील यांच्या पाठीशी ठामपणे रहा . महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात खानापूरच्या उपकेंद्राचे रखडलेले मंजुरीचे काम पूर्ण झालेले असेल हा माझा शब्द आहे.
यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील म्हणाले, वैभव दादा पाटील यांना मिळालेली उमेदवारी वारसा हक्कावर नसून त्यांच्या कर्तृत्वावर मिळालेली आहे. त्यांनी देशपातळीवरती स्वच्छतेमध्ये नगरपालिकेचा देशात प्रथम क्रमांक मिळवला. विट्याचा केलेला विकास आणि संस्थात्मक विकास करून तरुणांच्या हाताला काम, बेरोजगारीचा थोडाफार प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आणि मतदारसंघाचा चौफेर विकास साधण्याची दूरदृष्टी आणि धडपड यामुळेच त्यांच्या कर्तृत्वावर उमेदवारी मिळाली आहे. आता तुमची सर्व जनतेची जबाबदारी वाढते. जनतेने आता सावध राहणे गरजेचे आहे. मला फक्त खोक्यांचा धोका वाटतो. दोन पिढ्यांची तजवीज करून ठेवलेली आहे.
मी माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये मतदारसंघाचा सर्वांगीण समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला. आता ही धुरा मा.वैभव दादा पाटील यांच्याकडे आपण सुपूर्द करायचे आहे. आपलं महाविकास आघाडीचे तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवायचा आहे आणि वैभव दादा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचा आहे.
अध्यक्षीय भाषणात ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले की, आपल्या महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माननीय वैभव दादा पाटील यांच्या प्रचारासाठी कामाला लागून आपला गाव आपला परिसर पिंजून काढायचा आहे. तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचून पक्षाची विचारधारा लोकांना पटवून सांगायची आहे.
यावेळी आटपाडीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, संतोष जाधव, , मानसिंग भगत,माणिक भगत, महादेव साळुंखे पारे, तेजस्विनी पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाला देवराज पाटील, अरुण माने,सचिन शिंदे, पृथ्वीराज पाटील, किसन जानकर,राजुशेठ जानकर, सौ अनिता पाटील, सुवर्णाताई पाटील, विष्णुपंत पाटील,रघुनाथ पवार, चंद्रकांत पवार, अधिकराव हसबे, काका शेठ हसबे,प्रकाश गायकवाड,अजित जाधव, संजय मोहिते डॉ. विजय मुळीक, पिंटू शेठ जाधव, गोपीनाथ सूर्यवंशी, मारुती भगत,तानाजी पाटील, श्रीरंग शिंदे, प्रशांत सावंत, शाहरुख पठाण, विविध गावचे आजी-माजी सरपंच उपसरपंच, सदस्य आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रशांत पवार यांनी मानले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!