महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

नळदुर्ग शहरात मल्हार पाटलांचा झंजावात दौरा

राणा जगजितसिंह पाटलांनी करीत आसलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी व नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी दादांना समर्थन दया :- मल्हार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी नळदुर्ग शहरात झंजावात दौरा काढला असून राणा दादांना नळदुर्ग शहरासाठी केलेल्या विकास काम व विकास कामांना गती देण्यासाठी नळदुर्ग या ऐतिहासिक नळदुर्ग शहराला नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी मतदारांनी राणा दादाच्या डोक्यावर मायेचा हात ठेवावा आणि भरभरून आशीर्वाद द्यावा असे प्रतिपादन यूवा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले .
नुकताच नळदुर्ग शहरांमध्ये प्राचाराचा नारळ वाढवून पदयात्रा काढण्यात आली .
ते पुढे म्हणाले राणा जगजितसिंह पाटील यांना नागरिकांनी पुन्हा आपली सेवा करण्याची संधी व समर्थन द्यावे जेने करून विकास कामाना गती मिळेल असे ही प्रतिपादन युवा नेते मल्हार पाटील यांनी केले आहे
तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे अधिकृत उमेदवार राणा पाटील यांनी नळदुर्ग शहरांमध्ये केलेल्या विकासकाम आणि नागरिकांनी ज्या समस्या दादा समोर मांडल्या त्या समस्या दादांनी तात्काळ सोडविल्या आहेत पुढे नळदुर्ग साठी व तालुका निर्मितीच्या माध्यमातून आहे आपले बळ आपला आशीर्वाद दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दादांना भरभरून आशीर्वाद द्यावा आशी मतदाराना विनंती केली नळदुर्ग शहरात प्रचाराचा शुभारंभ करून पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा लोकमान्य वाचनालय येथे गणरायाचे पूजन करून ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी लोकमाता अहिल्याबाई होळकर चौक , शास्त्री चौक, ऐतिहासिक चावडी चौक , क्रांती चौक , ते पोलीस ठाणे किल्ला गेट साठे नगर, भीम नगर पर्यंत पदयात्रा काढून भीमनगर मध्ये नालंदा बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले यावेळी गावातील भाजपाचे नेते सुशांतजी भूमकर
नय्यर जागीरदार, गणेश मुरडे, समन्वयक समितीचे प्रमुख रणजीतसिंह ठाकुर माजी नगरसेवक सुधीर हजारे , बंडू , निखील घोडके , शहर प्रमुख धिमाजी घुगे ., संजय विठ्ठल जाधव , बबन चौधरी , शिवाजी गायकवाड , पांडु पुदाले, निरंजन राठोड , छमाबाई राठोड सागर हजारे , रिपाईचे बाबासाहेब बनसोडे , दुर्वास बनसोडे योगेश बनसोडे , बापू दुरुगकर सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!