दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत, फर्डे वक्ते, आमचे मित्र तसेच क्रांतिकारी जनताचे संपादक, आदरणीय जयवंत हिरे यांचा वाढदिवस!! दैनिक जागृत भारत तर्फे त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत, फर्डे वक्ते, आमचे मित्र तसेच क्रांतिकारी जनताचे संपादक, आदरणीय जयवंत हिरे यांचा वाढदिवस!! दैनिक जागृत भारत तर्फे त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
अत्यंत साधी राहणी, परंतु उच्च आणि अतिशय सखोल विचारसरणी असलेले. तसेच वागण्यामध्ये नम्रता, आदर परंतु अत्यंत निर्भीड असे असणारे.. वैचारिकते बरोबर कसलीही तडजोड न करणारे, आंबेडकरी चळवळीत प्रत्यक्ष भाग घेणारे, चळवळीचे अत्यंत सखोल विश्लेषण आणि लेखन करणारे लेखक तसेच कुणाचाही मुलाहीजा न ठेवता सडेतोड मत व्यक्त करणारे. दांभिक वृत्तीच्या विरोधात तुटून पडणारे म्हणजे दुसरे तिसरे जयवंत हिरे शिवाय कोण? जयवंत हिरेच
अत्यंत काटकसरीने जीवन जगत असतानाही, जीवनामध्ये अनेक संध्या आल्या असताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथील हत्याकांडा संदर्भात आपली भूमिका सतत लावून धरणारे, रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडातील नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करणारे संघर्षशील असे जयवंत हिरे.
अत्यंत मनमिळाऊ असे जयवंत हिरे, कुणाच्याही मदतीला एका पायावर तयार असतात. त्यांना भूमिका आवडली की, ते त्यांच्याबरोबर असतात. एखाद्यावर अन्याय झाला की, ते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरामध्ये कुठेही जाण्याची तयारी ठेवतात. नुकतेच ते बिहारला एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी जाऊन आले जिथे भलेभले जाण्यासाठी टरकतात तिथे जयवंत हिरे एका पायावर तयार असतात अशा या उमद्या तरुण तडफदार जयवंत हिरेना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून चळवळीची सेवा घडो ही सदिच्छा

आपला

डॉ डी एस सावंत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!