देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

समाजातील आंबेडकरी बौद्ध ( खरे बौद्ध) आणि गांधीवादी बौद्ध ( काँग्रेसी हरिजन ) कसे ओळखायचे ?

समाज माध्यमातून साभार

  1. आंबेडकरी बौद्ध हे तत्वनिष्ठ असतात. बाबासाहेबांच्या विचारांप्रती आणि चळवळी प्रती त्यांची अतुट बांधीलकी असते.
    त्याउलट गांधीवादी बौद्ध उर्फ काँग्रेसी हरिजन हे तत्वहिन, व्यव्हारिक, धंदेवाईक असतात. बाबासाहेबांच्या विचारांशी व आंबेडकरी चळवळीशी गांधीवादी बौद्धांची कुठलीच बांधीलकी नसते. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून ते काँग्रेस सारख्या ब्राम्हणवादी पक्षाकडून काही हाडकुळ चघळायला मिळतील काय ह्याच्या शोधात आयुष्यभर असतात.
  2. आंबेडकरी बौद्धांसाठी, आंबेडकरी चळवळ ही, समाजासाठी निस्वार्थीपणे काम करून बाबासाहेबा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम असते. आंबेडकरी बौद्ध त्यागाच्या आणि दानशूर पणाच्या भावनेतून आयुष्यभर समाजहितासाठी काम करत असतो.

त्याउलट हरिजन/काँग्रेसी बौद्ध हा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत असतो. त्याचे सामाजिक काम हे आंबेडकरी समाजाला फसवून आपली व्यक्तिगत पोळी भाजून घेण्यासाठी असते.

  1. आंबेडकरी बौद्ध हे सर्वसामान्य आंबेडकरी समाजातून येतात. आपल्या मेहनतीने, परिश्रमातून, प्रामाणिकपने, विधायक मार्गाने आपली आजीविका करून, ते स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती करून घेतात.

त्याउलट हरिजन/काँग्रेसी बौद्ध हे समाजातील एक नंबरचे पंटर, दलाल, एजंट, चमचे आणि सेटिंग बहाद्दूर लोक असतात. त्यांच्यात आरक्षणाचा फायदा घेऊन, उच्च सरकारी नोकऱ्या मधे भ्रष्टाचार करून, भरपुर माया कमावलेल्या बदमाश लोकांचा समावेश जास्त आहे. नोकरीत असताना भ्रष्टाचाराच्या पैशाची चटक लागल्यामुळे, रिटायर्ड झाल्यावर स्वाभाविकपणे हे लोक राजकारणाला धंदा म्हणून स्वीकारतात आणि काँग्रेस सारख्या ब्राम्हणवादी पक्षाकडे ओढले जातात.

  1. आंबेडकरी बौद्ध हे स्वभावाने स्वाभिमानी, तत्ववादी, प्रामाणिक आणि बुध्दाच्या मानवतावादी विचारांना मानणारे असतात.

त्याउलट हरिजन/काँग्रेसी बौद्ध हे स्वाभिमानशुन्य, लाचार, तत्वहीन, भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असतात. त्यांचा बौद्ध धम्मासोबत चा संबंध हा ड्रॉइंग रूम मध्ये बुद्ध रूप दाखवण्यासाठी असतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!