नवबौध्द समाजाच्या राजकीय कमी प्रतिनिधित्व साठी जबाबदार कोण?
ऍड अविनाश टी काले , अकलूज
लोकसभा , विधान सभा निवडणुकीत नवबौध्द व मातंग समाजाच्या लोकसंख्या चे प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कडून दिले जात नाही अशी ओरड सर्व सामान्य रित्या केली जाते .
आपण या ठिकाणी नवबौध्द समाजाचा विचार करणार आहोत ,
पूर्वाश्रमीचे हिंदू महार असलेला गाव गाड्या तील हा समाज अनुसूचित जाती मध्ये असून याचा रहिवास हा गावाच्या बाहेर अर्थात गावकुसाच्या बाहेर होता .
गाव , गावातील धर्म , आणि देवळाची पारंपारिक रचना यात देव पुजे दरम्यान आवश्यक असणारी शुचिता ही महत्वपूर्ण मानली जायची ,
अस्पृश्य म्हणून त्यांच्या वर लादलेली गावकुसा तील मृत पशू धनाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था ,
शेती प्रधान व्यवस्थेतील नंदी (बैल जोडी) ची पाणी उपसा ते शेत नांगरणी साठी असलेली गरज यातून पशू धनाची जननी असलेली “गाय ” कत्तल होऊ नये म्हणून तिच्यात प्रक्षेपित केलेली “मातेची “प्रतिमा आणि या हून पुढे जात तिच्यात देवांचा रहिवास असलेली मान्यता याने तिला पुजूनियता प्राप्त झाली .
पण ती जेंव्हा मृत होते तेंव्हा तिच्या कातड्याची उपयोगिता ही नजरेआड करता येण्या सारखी नव्हती ,
शेकडो वर्षा पूर्वी हे मृत मास खाणारे , त्याचे कातडे काढून त्यावर प्रक्रिया करणारे व प्रक्रिया केलेल्या चामड्याच्या पखाली , पादत्राणे , चाबकाची वादी , घुंगरा चे पट्टे , या साठी हेच कातडे वापरले जाई.
जात व्यवस्थेत म्हणून चर्मकार , त्या नंतर ढोर , त्या नंतर महार व मातंग असा क्रम लागला
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या अस्पृश्य वर्गाच्या सर्वांगीण प्रगती साठी त्यांचे राहणीमान , खाण्याच्या सवयी या पासून सुरुवात करून अंतर्गत बदल घडवून आणला
आणि या मोहिमेचा भाग म्हणून समग्र धर्मशास्त्र , रूढी परंपरा यांचा मागोवा अभ्यास पूर्वक घेतला .
सामाजिक सुधारणा साठी या चिकित्सेची आवश्यकता होती , ती त्यांनी पूर्ण केली .
पुढे आपल्या समाजाला निती व धम्म असावा म्हणून बौद्ध धम्माचा पर्याय धम्मचक्र गतिमान करून दिला .
इथे नवबौध्द समाजाचा दुसऱ्या पर्वा चां प्रारंभ होतो ,
त्यांच्या दृष्टीने ” हिंदू ” धर्म त्यांच्या श्रद्धा आणि उपासना व मान्यता यांचे नाते राहिले नाही ,
तिथे त्या पुढे या चिकित्सा थांबवून समाजा अंतर्गत सुधारणा यावर समाज धुरिणांनी भर देणे आवश्यक असताना ही त्याच त्या चिकित्सा ,करण्याचे काम नवबौध्द समाजातील लोकांनी थांबवले नाही.
भारतीय राज्य घटना अस्तित्वात आल्या नंतर या व्यवस्थेने मान्य केलेले प्रत्येक भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म पाळण्याचे , उपासना पद्धत स्वीकारण्याचे , श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य मान्य करून आपापले स्वांतत्र्य ही जपून स्वंतत्र वाटचाल करण्याचे ठरवणे आवश्यक असताना ही त्याची दक्षता घेतली नाही ,
भाषण , कविता , लेख , पुस्तके आणि चर्चा , अलीकडे आलेली इलेक्ट्रॉनिक साधने , यातून हे प्रकार चालूच राहिले ,
याचा सार्वत्रिक परिणाम म्हणून बहुसंख्य असलेल्या समाज वर्गा पासून नवबौध्द समाज अलग पडू लागला .
कांहीं महिन्या पूर्वी मी सांगोला भागातील युट्यूब वर भटक्या विमुक्तातील ” मरीआई वाले” समाजाच्या अशिक्षित बाईची मुलाखत ऐकली ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि आमचा संबंध नाही , त्यांचे लोक आमच्या देवाला मानत नाहीत म्हणून आम्ही ही त्यांना मानत नाही .
असे वाक्य त्या महिलेने बोलून दाखवले .
ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे ,
सांस्कृतिक वेगळेपण आल्याने हे अलगत्व आलेले नाही तर आपल्या अतिरेकी वृत्ती ने ते ओढवून आणलेले आहे .
राजकीय दृष्ट्या नवबौध्द समाजाचे स्वंतत्र राजकीय पक्ष आहेत , यातील गट तट बाजूला ठेऊन समग्र नवबौध्द समाज एकिकृत झाला तरी या समाजाची स्वंतत्र टक्के वारी इतकी नाही की संयुक्त मतदार संघात हा समाज स्व बळावर सत्ता खेचू शकेल .
राजकारणात समविचारी पक्षा शी राजकीय आघाडी करून सत्तेत प्रवेश करता येईल हा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेला आहे .
भारतात अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षात आपण पुरोगामी आणि प्रतिगामी असे विभाजन निर्माण केले .
परंतु आपण एक बाब विसरलो की पुरोगामित्व आणि श्रद्धा या भिन्न बाबी आहेत ,
नवबौध्द समाजातील एका तरुण वक्त्याला मी प्रश्न विचारत गेलो आणि त्या उत्तरातून आपणास व्यवस्था ही समजते .
मी त्याला पाहिला प्रश्न विचारला ,
पर धर्मीय लोक त्यांच्या प्रेषितांची जयंती “मोहरम” साजरा करत आहेत , त्यांची मिरवणूक निघालेली आहे , डॉल्बी लाऊन तरुण नाचत आहेत , त्या आनंदात सामील व्हावे आपण ही नाचावे आणि समग्र मिरवणूक आस्थेने पूर्ण करावी असे तुम्ही कराल का?
यावर त्यांचे उत्तर नकारार्थी होते ,
आज जात निहाय असे सर्वच महा पुरुष समाजाने वाटून घेतले आहेत , व ते ते समाज हे उत्सव म्हणून साजरे करतात ,
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती त नवबौध्द जात नाहीत , वक्ते म्हणून जातात .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती त राजकीय नेते हजेरी लावतात , , ते इफ्तार पार्टी त हजेरी लावतात याचा अर्थ त्यांनी तुमच्या श्रद्धा स्वीकारलेल्या आहेत असा होत नाही , त्यांच्या श्रद्धा , उपासना , विश्वास , आणि मान्यता या त्यांच्या सोबत असतात व राहतात ही बाब विसरून जाहीर रित्या पुस्तकाचे वाचन करावे तसे 22प्रतिज्ञा उपस्थित समाजा कडून वदवून घेण्याचा प्रकार म्हणजे कहर च नाही काय?
भारतातील गाव कुसातील प्रस्थापित पक्षात बहुसंख्य हिंदू च राहणार आहेत , हे मान्य करून समायोजन करून राहायचे की फटकून वागायचे ? याचा निर्णय समाजाला च घ्यावा लागणार आहे
वरिष्ठ पातळीवर आपल्या स्वतंत्र पक्षाचे अस्तित्वात असलेले राजकारण मान्य करून त्याचे कार्यकर्ते बनून समाजाने रहायचे .
समाजातील एखादा दुसरा कार्यकर्ता इतर पक्षात गेला की त्याला एकाकी पाडायचे , आणि अश्या शक्ती विहीन कार्यकर्त्याला समाजाचा घटक म्हणून प्रस्थापित पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून मागणी करायची ,,,
ते अश्या शक्ती विहीन कार्यकर्त्याला उमेदवारी का देतील?
संसदीय राजकारणात लोक शक्ती ला सामर्थ्य असते , ज्याची वानवा ( कमतरता) आपल्या कडे आहे
अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या जागेवर प्रत्येक समाजाचे 7/8लोक उभे राहतात , प्रत्येकाला आमदार खासदार व्हायचे असते , पण करणार कोण? याचा ते विचारच करत नाहीत .
आपले डीपॉझिट ही वाचवू न शकणाऱ्या या उमेदवारांच्या भाऊ गर्दी कडे पाहून मला त्यांच्या अती आत्मविश्वासा चे नवल वाटते ,
लोकशाहीची पूर्तता झाल्याचे , लढल्याचे समाधान त्यांना मिळते , आणि कांहीं कार्यकर्त्यांची सर्व प्रकारची सोय होते पण समाज पुन्हा पुन्हा हरत राहतो , हेच नवबौध्द समाजाचे प्राक्तन आहे , आणि ते हतबल होऊन पाहणे एवढेच आमच्या व आपल्या सर्वांच्या हातात आहे ,,,,,,! जय भीम ,, जय अण्णा भाऊ,,,,,!
🙏🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत