धन्वंतरी हा विष्णूचा अवतार नसून तो एक आयुर्वेदाचार्य बौद्ध भिक्खू होता.
धन्वंतरी हा विष्णूचा अवतार नसून तो एक आयुर्वेदाचार्य बौद्ध भिक्खू होता. उत्खननामध्ये या धन्वंतरी बौद्ध भिक्खुचे आरोग्यविहार सापडलेले आहे.
आज धनत्रयोदशी निमित्य सर्व भारतीय धन्वंतरी या बौद्ध भिक्खुची पूजा करणार आहे. धन्वंतरी हा आयुर्वेदाचा एक मोठा चिकित्सक बौद्ध भिक्खु होता. परंतु या देशातील भ्रमवादी टोळी ने आणि भोवादी लोकांनी हा सत्य इतिहास दडपून टाकून त्या इतिहासामध्ये घोटाळा करून खोटा इतिहास जनतेसमोर मांडला.
सत्य हे जास्त काळ दडपून टाकता येत नाही म्हणून बिहारमध्ये झालेल्या उत्खननामध्ये बौद्ध भिक्खु धन्वंतरी याचे आरोग्यविहार सापडलेले आहे तुमच्या खात्रीसाठी द्या बौद्ध भिक्खुच्या आरोग्यविहाराची फोटोकॉपी खाली दिलेली आहे.
या बौद्ध भिक्खुच्या विहारांमध्ये आजारी लोकांवर आयुर्वेदिक उपचार केला जात असे. आयुर्वेदाचे जनक हे बौद्ध भिक्खू होय हे यावरून सिद्ध होते.
परंतु भ्रमवादी, भोवादी टोळीने या सत्य इतिहासाची मोडतोड करून घोटाळा करून एक खोटा इतिहास या देशातील बहुजन हिंदू समाजासमोर मांडून या समाजाला भ्रमित करून ते म्हणतात :
“धन्वंतरी हे एक हिंदू धर्मातील प्रमुख देवता आहे तिलाच आयुर्वेद आणि चिकित्सा च्या स्वरूपात पूजा केली जात आहे. धन्वंतरीलाच भगवान विष्णूचा अवतार सुद्धा मानल्या जात आहे. स्वास्थ आयुर्वेद आणि चिकित्सा त्या क्षेत्रात यश धन्वंतरी ची पूजा केली जात आहे.”
सत्य मात्र असे आहे की, धन्वंतरी हा एक आयुर्वेदाचार्य बौद्ध भिक्खू होता आणि आज धनत्रयोदशीनिमित्त या देशातील सर्व बहुजन हिंदू समाज त्याच धन्वंतरी बौद्ध भिकूची पूजा करणार आहेत. भ्रमवादी लोकांनी मात्र आज त्या बौद्ध भिक्खु आयुर्वेदाचार्य याचे स्वरूप पूर्ण बदलवून इतिहासामध्ये सर्वात मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे. धनत्रयोदशी निमित्त आपणास सादर.
प्रा. गंगाधर नाखले
29/10/2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत