देवीदेवतांच्या विश्वासावर भरोसा ठेवून जीवन जगणे म्हणजे जीवन परावलंबी करणे आहे
देवीदेवतांच्या विश्वासावर भरोसा ठेवून जीवन जगणे म्हणजे जीवन परावलंबी करणे आहे, असे वाटते !
मा. सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांनी मी गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो असे दिनांक 21/10/24 च्या दैनिक लोकमतमधील बातमीत म्हटले आहे. हे वाचून आश्चर्य वाटले. यावरून समाजात आणि अडाणी लोकात काय संदेश जातो ? त्यांनी म्हटले असते की माझे वडील सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होते त्यांचा आदर्श घेऊन मी सरन्यायाधीश झालो, तर समाजात चांगला संदेश गेला असता. ते म्हणाले अयोध्या प्रकरणी भगवंताकडे प्रार्थना केली आणि मार्ग निघाला, परंतु त्यांनाही न्याय देतांना काहीतरी हृदयात धळधळ केले असावे असे वाटते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समाजाला मान्य करावा लागतो.
- मा. सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांनी गणपतीची प्रार्थना करते वेळी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आले आणि सोबत पूजा केली आणि पाहिले तेव्हाच मला आश्चर्य वाटले, मला वाटले न्यायाधीश देवीदेवतांची पूजा करीत नसावे. खरे तर न्यायाधीश, डॉक्टर्स आणि संशोधक यांनी देवीदेवतांची पूजा करू नये, कारण ते स्वतःचा विश्वास गमावून परावलंबी होणे आहे. वास्तविक पाहता देवीदेवतांवर आपली कितीही आस्था असली तरी ते आपले चांगलेही करीत नाही आणि वाईटही करीत नाही. माणसाची कृत्य (कर्म) त्याला कारणीभूत असतात असे वाटते. खरे तर माणसाने आपले जीवन कसे घडवायचे याबद्दल मार्गदर्शन व्हायला पाहिजे.
- .देवीदेवतांच्या विश्वासावर भरोसा ठेवून जगणे म्हणजे मुलाने कॉपी करून कॉपीच्या भरोशावर परीक्षेत पास होण्यासारखे आहे, असे वाटते. त्याच्या मनात चांगले विचार असतात ते त्याला विसरावे लागते आणि चुकीचा मार्ग स्वीकारतो त्यामुळे त्याचे व समाजाचेही नुकसान होते.
- एखादा माणूस एटीएम फोडून पैसे घेऊन पळाला किंवा एखादा माणूस नक्षलवादी झाला व त्याला विचारले, तू असे कां केले तर तो म्हणेल माझ्या देवानेच तसे आदेश दिले आहे ,असा माणूस कोर्टात गेला तर त्याला कोर्ट कोणता न्याय देईल ?
- माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार असतात, अनेक संकट येतात तेव्हा त्याला वाटेल हे संकट देवाने आणले आणि आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू लागतील. संविधानातील वैज्ञानिक दृष्टी दिली असती तर लाखो कुटुंब अज्ञानाच्या दु:खातून बाहेर निघू शकले असते, असे वाटते.
म. वा.दहिवले
एक ज्येष्ठ नागरिक, वैशाली नगर, भंडारा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत