डी. उषा
त्याकाळी मुंबईत एक पोटनिवडणूक झाली.
त्यात
हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून
सेनेचे रमेश प्रभू यांची आमदारकी
कोर्टाने रद्द केली.
खुद्द शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार सहा वर्षांसाठी गोठवला गेला.
ही गोष्ट १९८६ सालची !
आज अडतीस वर्षांनी खुलेआम हिंदुत्वाचा प्रचार होतोय.
धर्माच्या नावावर मतं मागत आहेत.
देशाचे प्रमुख
न्यायाधीशांच्या घरी जाऊन आरती करू लागले.
बटेंगे तो कटेंगे ही प्रचाराची टॅग लाईन झाली.
घरच्या देवाला साकडं घालून
न्यायाधीश निकाल देत आहेत.
तुरुंगातील गँगस्टर हिंदूंचा मसिहा झालाय.
न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुटली.
तीच पट्टी न्याय देवतेच्या तोंडात कोंबून आवाज बंद केलाय.
बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणारे ,
विचारवंतांना धमक्या देऊ लागले.
विचारवंतांच्या हत्येतील आरोपी ,
सत्ताधारी पक्षात प्रवेश करू लागलेत.
निवडणूक निव्वळ एक फार्स बनून राहिला आहे.
उरकून घ्या लवकर !
तळटीप :
धार्मिक भेसळीची लोकशाही
हा देश एकसंध ठेवणार नाही.
सखोल तळटीप :
उघडा डोळे बघा नीट !
गुन्हेगार झाले भलतेच धीट !!
सहज जाता जाता
कितीही जोर लावा ,
महाराष्ट्र गाय पट्टा होणार नाही !!
©डी. उषा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत