देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

शासनकर्ती जमात व्हायला आकडेवारी नाही, इच्छाशक्ती लागते.

ऑक्टोबर ११, २०२३
१९९३ ला जेव्हा सुरुवातीला मुलायम मुख्यमंत्री असलेली सपा बसपा युती तुटली भाजपकडे १७७, सपाकडे १०९ आणि बसपाकडे ६७ जागा होत्या.

अटलबिहारीना वाटलं कांशीराम फोन करेल आणि म्हणेल “अटल आप सरकार बनाओ मैं समर्थन देता हूं!”

आणि अटलबिहारीचा फोन वाजला.

फोन कांशीरामचा होता.

अटलबिहारी खुश झाले.

कांशीराम म्हणाले,” अटल मैं सरकार बना रहा हूं समर्थन दोगे क्या?”

अटलबिहारी शॉक मध्ये. भाजपचे १७७ आणि बसपाचे ६७ आमदार आणि हा माणूस बोलतोय,”मैं सरकार बना रहा हूं समर्थन दोगे क्या?”

कांशीराम म्हणाले,”पुन्हा निवडणूक व्हाव्या आणि जनतेचा पैसा खर्च व्हावा ही माझी इच्छा नाही, तुम्हाला सरकार बनवायचे असेल तर माझा पाठिंबा लागेल आणि तो मी देणार नाही. जर माझ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत असाल तर मला हरकत नाही. हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या आमच्या समाजाला “हुकमरान” बनवायची ही संधी मी सोडणार नाही.”

अटलबिहारींनी काही तासांचा वेळ मागितला, आणि बहुजन समाज पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला.

आणि हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या पुरुषसत्ताक ब्राम्हणवादी व्यवस्थेने उभारलेल्या अतिमागास समाजातून आलेली एक युवती उत्तर प्रदेश सारख्या सर्वात कर्मठ, सनातन आणि सरंजामी राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री झाली.

नाव होतं, मायावती. तारीख होती ३ जून १९९५.

शासनकर्ती जमात व्हायला आकडेवारी नाही, इच्छाशक्ती लागते.

आमच्या पराभूत मानसिकतेला ती इच्छाशक्तीच जिंकवू शकते.

लहरीदास कांबळे जिल्हाप्रभारी सांगली बसपा
जयभीम.
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!