तिबेट स्वातंत्र्याच्या शांतीमय लढायला बळ द्या – डॉ. डी. एस. सावंत
तिबेटचे स्वतंत्रता आणि भारताची सुरक्षा या विषयावर दिनांक १५/१०/२०२४ प्रेस क्लब मुंबई येथे तिबेट भारत मैत्री संघ यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन आणि अध्यक्षता मा. राजाराम खरात यांनी केले. ताशी देकी भारत तिबेट समन्वयक नवी दिल्ली यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून भौगोलिक दृष्ट्या तिबेट भारताचा अर्धा भाग असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ‘भारत और तिब्बत’ विजय क्रांती यांनी संपादित केलेले पुस्तक सर्व उपस्थितांना मोफत वाटले. सदर पत्रकार परिषदेला बाळासाहेब रास्ते, ad. राकेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. Ad. गजानन लासुरे, डॉ. डी.एस. सावंत (चीफ मॅनेजर रेल्वे बँक ), सुनील कांबळे, डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रा. मानिराम डेकाटे, सिद्धार्थ उघाडे, सुनील दुपटे, भाऊ शिर्के, ad. ए.आर. कांबळे, अरविंद निकोसे यांनी आपले विचार मांडले. भारतात निर्वासित आश्रित असलेल्या तिबेटीयन नागरिकांना भारतातील नागरिकांचा, बौद्धांचा जाहीर पाठिंबा व सपोर्ट असल्याचे वक्त्यांनी जाहीर केले. तिबेटियन नागरिकांच्या लढ्याची संघर्षाची माहिती भारतातील जन सामान्य नागरिकांनागरिकांपर्यंत पोहचविण्याबाबत विचारवंतानी विचार मांडले.
राजाराम खरात म्हणाले की, इतिहासाच्या मागे गेलो तर 1962 मध्ये चायनाने भारतावर आक्रमण केले होते. आणि त्याच वेळेला तिबेट देशाला चीनने गिळंकृत केले आणि 1949 पासून जेव्हा चायनाने तिबेटवर आक्रमण केले, तेव्हापासून तिथून तेथील नागरिक हळूहळू बाहेर पडू लागले. म्हणजेच ते आपला देश सोडून भारताच्या आश्रयाला आले. दलाई लामा यांनी सुद्धा भारतात आश्रय घेतला. तिबेट मध्ये चायनाचा छळवात मोठ्या प्रमाणात चालू असल्याने भंतेना तसेच तिबेटियन नागरिकांना भारत सरकारने आश्रय दिला. भारत सरकारने तिबेटची पाठराखण केली आहे. आज दोन पिढ्या होऊन गेल्या आहेत. तरीही तिबेटची स्वातंत्र्याची चळवळ अजून ही चालू आहे. आमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे ही भावना आजपर्यंत जागृत ठेवले आहे, हे फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
तिबेट ने दिलेल्या शांतीपूर्ण लढ्याचा थोडक्यात इतिहास सांगून त्या लढ्याला बळ द्यावे असे प्रतिपादन डॉ डी एस सावंत यांनी केले
एखादा समूह पन्नास साठ वर्ष शांततेच्या मार्गाने बुद्ध धम्माच्या मार्गाने लढतो आहे. दलाई लामांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी सतत ही लढाई शांततेच्या मार्गाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून आपणही भारत सरकारने जेव्हा सहकार्य केल, तेव्हा आपण असं ठरवलं की भारतीय लोकांचं कर्तव्य आहे की या लोकांच्या पाठीमागे उभ राहणं. त्यांनी आपल्या उपजीविविकेचे साधन म्हणून त्यांनी स्वतः विणलेले स्वेटर परळ सारख्या अनेक विभागात विकत आहेत.
तिबेटवर चायनाने आक्रमण केले नसते, आणि तिबेट स्वतंत्र असतात तर चायनाला भारतावर आक्रमण करणे अवघड झाले असते. कारण तिबेट मध्ये होता, म्हणून चिनने प्रथम तिबेटवर कब्जा केला आणि त्यानंतर भारतावर आक्रमण केले.
आज ही तिबेटिन लोक लढाई लढत असून, भारतीयांचे नेतिक कर्तव्य आहे निदान सपोर्टर म्हणून उभ राहिले पाहिजे, असे राजाराम खरात यावेळी बोलताना म्हणाले.
आम्ही भारतीय साप्ताहिकाचे संपादक मा. दिनेश बोधिराज यावेळी बोलताना म्हणाले, तिबेटीयन जनता बौध्द आहे आणि म्हणून भारतीय बौद्धानी तिबेटियन जनतेला सहकार्य करणे हे त्यांचे आध्य कर्तव्य आहे. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कमुनिष्ठांपासून सावध राहा असा उपदेश असल्याचे सांगत, चीनच्या हया विचारधारेचा समाचार घेतला. एका व्यक्तीला नितिमूल्यांची गरज नसते, परंतु एकापेक्षा अनेक लोक एकत्र आले तर नीतिमूल्यांची गरज भासते. संपूर्ण जग हे बुद्धांच्या पंचशेलेवर चालले आहे. जगाच्या हया विकसित ज्ञानाची निर्मिती भारतात झाली आहे. भारतभर तिबेटियन जनतेसाठी रॅली मार्च काढून, याबाबतचा आवाज युनो मध्ये उठवला पाहिजे असे ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत