बौद्ध समाज राजकीय आरक्षणापासून दुर्लक्षित व वंचित का ?
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 29 एस.सी साठी राखीव असलेल्या जागा खालील प्रमाणे….
१) जळगाव जिल्हा भुसावळ मतदारसंघ
२) बुलढाणा जिल्हा मेहकर मतदार संघ
३) अकोला जिल्हा मुर्तीजापुर मतदार संघ
४) वाशिम जिल्हा वाशिम मतदार संघ
५) अमरावती जिल्हा दर्यापूर मतदारसंघ
६) नागपूर जिल्हा उमरेड मतदार संघ
७) नागपूर उत्तर मतदारसंघ
८) भंडारा जिल्हा भंडारा मतदारसंघ
९) गोंदिया जिल्हा अर्जनी मोरगाव मतदार संघ
१०) चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर मतदारसंघ
११) यवतमाळ जिल्हा उमरखेड मतदार संघ
१२) नांदेड जिल्हा देगलूर मतदारसंघ
१३) जालना जिल्हा बदनापूर मतदारसंघ
१४) औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद पश्चिम
१५) नाशिक जिल्हा देवळाली मतदारसंघ
१६) ठाणे जिल्हा अंबरनाथ मतदारसंघ
१७) मुंबई सब अर्बन कुर्ला मतदार संघ
१८) मुंबई शहर धारावी मतदारसंघ
१९) पुणे जिल्हा पुणे कॅन्टोन्मेंट
२०) पुणे जिल्हा पिंपरी मतदारसंघ
२१) अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर मतदारसंघ
२२) बीड जिल्हा केज मतदार संघ
२३) लातूर जिल्हा उदगीर मतदार संघ
२४) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा उमरगा मतदार संघ
२५) सोलापूर जिल्हा मोहोळ मतदार संघ
२६) सोलापूर जिल्हा माळशिरस मतदार संघ
२७) सोलापूर जिल्हा फलटण मतदारसंघ
२८) कोल्हापूर जिल्हा हातकलंगले मतदारसंघ
आणि
२९) सांगली जिल्हा मिरज मतदार संघ
एवढे जिल्ह्यातील वर नमूद मतदार संघ एस सी साठी राखीव असून या जिल्ह्यामधून कृपया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी सच्चे कार्यकर्ते ईतर पक्षात काम करणारे दुराचारी/लाचारी लोक निवडून दिले जातात त्यामुळे आपला बौद्ध समाज शिक्षण घेऊन सुद्धा राजकीय आरक्षणापासून दुर्लक्षित व वंचित ठेवला गेलेला आहे हे आपल्या समाजातील लोकांना केव्हा कळेल ?
एस सी च्या जागेवरती सत्ताधाऱ्यांचे गुलामी करणारे एस सी मध्ये मोडत असलेले इतर समाजाचे/ अजून वेगवेगळे लोक त्यांना निवडून देण्यासाठी विरोधकांचे सुद्धा लोक आपल्या बौद्ध किंवा महार जातीतील लोकांना निवडून देतात का ?
याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे
बंधू आणि भगिनींनो कृपया आपण आपापल्या मतदारसंघातील अनुसूचित जाती तून या निवडणुकीमध्ये व या निवडणुकीच्या पूर्वी कोणत्या समाजाचे लोक काँग्रेसने किंवा भाजपने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गट यांचेमार्फत निवडून येऊन आपल्या समाजात चळवळ करणारे कार्यकर्ते निवडून दिले जात नाहीत ही गोष्ट आपण कटाक्षाने लक्षात घेणे आवश्यक आहे .
महत्त्वाचे सांगायचे म्हणजे आपल्या समाजातील अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांनी ,प्रत्येकाचे आपापले पक्ष काढलेले आहेत व निवडून न येता विधान परिषदेवर जातात कोणी राज्यसभेवर जातो परंतु पब्लिक मार्फत निवडून येऊन हक्काचे पद मिळवत नाहीत ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे .त्यासाठी शिव ,फुले ,शाहू व आंबेडकर यांच्या मताची लोक विधानसभेमध्ये जाणे गरजेचे आहे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपल्या सर्व बंधू-भगिनींनी प्रयत्न करणे फारच गरजेचे आहे केवळ एक शब्द बोलून संपूर्ण समाजाच्या लोकांची मते काँग्रेसने त्यांच्या बाजूने मिळवली तो मुद्दा होता आरक्षणाचा व सविधान बदलण्याचा. तरी माझ्या तमाम बौद्ध अनुयायांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपसातले हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या समाजाचा कार्यकर्ता नेता निवडून द्यावा ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत