
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले अकलूज
मो न 9960178213
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
साधारण 2सप्टेंबर 2024रोजी बँकिग कामगार संघटनेचे अध्यक्ष व अर्थ तज्ञ असलेल्या विश्वास राव उटगी यांच्या कडे जाण्याचा योग आला ,
सर भरभरून अत्यंत पोट तिडकिने बोलत होते आणि मी ते एखाद्या जिज्ञासू भुकेने अधिग्रहित करत होतो ,
राजकारण म्हणजे या समाजात अस्तित्वात असलेल्या आरक्षण लढाया , जाती धर्मातील वैमनस्य , एक मेकाचे विरोधातील केलेल्या टीका , आरोप प्रत्यारोप , इतकेच नसते .
सर्व सामान्य तुमच्या आमच्या सारख्या माणसांना त्यात गुंतवून ठेऊन प्रत्यक्ष राज्य कारभार चालवणारे कारभारी राज्यकर्ते जे निर्णय कायदे मंडळात घेतात व त्या द्वारे जी दिशा ते देऊ इच्छितात त्यातून तो देश ते राज्य कोणत्या दिशेला जाणार? त्याचा प्रत्यक्ष फायदा कोणाला मिळणार ? हे निच्छित होत असते ,,
केंद्रात आणि राज्यात आज एन डी र चे शासन अस्तित्वात आहे , आणि ते 2014पासून मोदी , अदानी , अंबानी यांच्या भोवती फिरते आहे ,
ग्रामीण भागात गारुडी जादूचे खेळ दाखवत असतो तेंव्हा त्याचे हातातील वाजणारे डमरू आणि त्यांच्या तोंडातून पडणारे निरर्थक शब्द “जमुरे ” या कडे वेधलेले असते , तेंव्हा आत प्रत्यक्षात हात चलाखीचे प्रयोग चालू असतात ,
दर्शकांना जेंव्हा चमत्कार दिसतात तेंव्हा तो आच्छर्य चकित होतो •
म्हणून जे लाभ जनतेला दिले जातात , ज्यात जनतेला गुंतवून ठेवले जाते त्याच्या पलीकडे जे अर्थकारण चालू असते तेच खरे राजकारण असते , आणि करोडो अब्जावधींची माया राज्यकर्ते याच माध्यमातून अर्जित करतात ,, पण त्याची जबर किंमत ही शेवटी सर्वच जनतेला चुकवावी लागते , याचे कारण तेच खरे मालक असतात , भूमी पुत्र असतात .
1960साली भाषिक राज्य निर्मिती ची घोषणा झाली पण तेंव्हा मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी ठेवली होती , ती महाराष्ट्रात राहावी म्हणून कामगारांनी आणि मराठी जनतेने आंदोलन केले , शेकडो बलिदान आणि राज्य व्यापी आंदोलनाने मुंबई महाराष्ट्रात आली ,
ती मुंबई मराठी माणसांची होती , प्र के अत्रे , एस एम जोशी , शाहीर अमर शेख , क्रांतिकारी लेखक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सह गिरणी कामगार आणि श्रमिकांची ती मुंबई होती ,
चिरा नगर , ते धारावी, चुना भट्टी परळ अशी कष्टकऱ्यांची मुंबई हळू हळू भांडवलदार जगताकडे स्थलांतरीत झाली ,
कापड मिल बंद पडल्या कामगार देशोधडीला लागले , मिल साठी शासनाने दिलेल्या जमिनी बिल्डर लॉबी कडे स्थलातरित झाल्या ,
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या खाली बिल्डर लॉबी ला टॉवर उभारण्याच्या परवानगी देण्यात आल्या , या उत्तुंग अनेक मजली घरांच्या किमती तीन कोटी ते 25कोटी पर्यंत विक्री केल्या जाऊ लागल्या ,
आणि तेथील मूळ झोपडी धारक कष्टकरी माणसाला 300ते 350 स्क्वेअर फुटाचे बांधकाम असलेले घर उपलब्ध करण्यासाठी दोन तीन टॉवर उभे केले गेले ,
तो कामगार त्याच्या झोपडीत लघु उद्योग करत होता , तो उद्योग त्याचे हातातून हिसकावून घेण्यात आला , आज या कष्टकरी माणसांच्या हातात असलेले काम हे असंघटित क्षेत्रातील आहे , आणि त्यांचे मासिक वेतन हे फार फार दहा ते पंधरा हजार रुपये इतके मर्यादित झालेले आहे ,
हातात असलेला रोजगार ही सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे ,
दुसऱ्या बाजूने (M M R) द मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन निर्माण होत आहे , त्याचा विस्तार 4355 वर्ग किलोमीटर इतका व्यापक आहे , पालघर , ठाणे , रायगड ( अलिबाग) अश्या जिल्ह्यांना कवेत घेऊन ( 8 ) महा नगरपालिका ज्यात ग्रेट मुंबई , ठाणे , , कल्याण डोंबिवली , नवी मुंबई , उल्हास नगर , भिवंडी , निझामपूर, वसई विरार आणि मिरा भाईंदर
तर ( 9 )महा पालिका ज्यात अंबरनाथ , कुळगाव , बदलापूर , माथेरान, कर्जत, पनवेल , खोपोली, पेन , उरण , आणि अलिबाग यासह 1,000गावे जी ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आहेत त्यांच्या एकात्मिक विकासाची जबाबदारी ही
( MMRDA) वर आहे
यांना फास्ट दळण वळण याने जोडण्यासाठी मेट्रो ची निर्मिती करण्यात आली आहे , अनेक उड्डाण पुले अस्तित्वात आल्याने अनेक दुकाने , बंद पडली आहेत , तेथील रोजगार गेल्याने मुक्त झालेल्या जागेवर कॉर्पोरेट जगताच्या आलिशान ऑफिसेस ची निर्मिती झाली आहे ,, आणि एक चकचकीत नव्या जगाची निर्मिती होत आहे ,
धारावी सारखी लघु रोजगार केंद्र असणारी जागा ही अदानी सारख्या कडे वर्ग होत असताना धारावी बचाव सारखे लढे गेल्या वर्षी उभे राहिले ,
अर्बन सीलिंग ॲक्ट खाली घेतलेल्या शासकीय जागा , रेल्वेच्या बाजूच्या जागा या शासनास विक्री करता येत नसल्याने त्या प्रोजेक्ट चे नावाखाली लिज वर भांडवलदार वर्गाकडे सोपवल्या जात आहेत ,
मुंबई एअरपोर्ट , जे एन पी टी अदानी कडे गेलेच आहे , आत्ता वाढवान बंदर ही त्यांच्या ताब्यात जात आहे ,
एम एम आर डी रिजन हे भविष्यातील केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्याचे फक्त सोपस्कार म्हणून शिल्लक राहिलेले आहे ,
आज संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम विद्युत गतीने खेडो पाडी जोरकसपणे चालू झाले आहे , याचे कारण एम एस ई बी हे अदानी कडे सपूर्द होत आहे ,
आज शेतकरी वर्गाला मिळणारी सवलती मधील वीज पुढील काळात मिळणे दुरापास्त आहे किंवा ती मिळणारच नाही ,
खाजगी विकासकांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या रस्त्यांच्या टोल नाक्यावरील वसूल दार जनतेने पाहिलेले आहेत , हळू हळू ते ही गायब झाले , त्यांची वसुली फास्ट टॅग चे माध्यमातून आपोआप होते ,
मोबाईल रिचार्ज संपला की जसे सगळे प्रोग्राम थांबतात आणि हातात राहतो फक्त मोबाईल संच ,,
तशी वीज ही आपो आप खंडीत होईल ,,
शिक्षण , आरोग्य , वाहतूक , सार्वजनिक सेवा सगळे संपून खाजगीकरणाच्या दिशेने झपाट्याने चाललेल्या अर्थ व्यवस्थेत कुठे असणार आहे तुमचे आरक्षण आणि
तुमचा आमचा गाव पातळीवरील खोटा जात अंहकार ? आणि धार्मिक अस्मितेच्या लढाया ?
आपण शासनाच्या हातातील कठपुतळ्या बनलेले आहोत ,
आणि आपले मालक बनलेले शासन प्रत्यक्षात त्यांचे कठ पुतळे आहेत जे ह्या राष्ट्राची संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेत आहेत ,,
त्याच्या साठी त्यांना एक छत्री राजवट हवी आहे , त्या साठी मत चोरी हवी आहे ,
भारतीय राज्य घटना , लोकशाही व्यवस्था , विरोधी पक्ष हे अडथळे उध्वस्त करणे हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे ,,,,!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत