जयमंङ्गल अठ्ठगाथा
बाहुं सहस्सभिनिम्मित सावुधन्तुं,
गिरीमेखलं उदित घोर-ससेन-मारं
दानादि धम्मविधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||१||
मारातिरेक-मभियुज्झित सब्बरती,
घोरम्पनाल वक मक्ख मंथद्ध, यक्ख|
खन्ती सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||२||
नागगिरि गजवरं अतिमत्तभूतं,
दावग्गि चक्कमसनीव सुदारुणन्तं
मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||३||
उक्खित्त खग्गमतिहत्थ सुदारुणन्तं,
धावन्ति योजनपंथगुलि-मालवन्तं |
इध्दीभिसङगखत मनो जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||४||
कत्वान कठ्ठमुदरेंव इवगब्भिनीया,
चिञ्चाय दुठ्ठवचन जनकाय मज्झे,
सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||५||
सच्चं विहाय - मतिसच्चकं वादकेन्तु
वादाभिरोपितमनं अतिअन्धभूतं
पञ्ञापदीजलितो जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||६||
नन्दो पनन्द - भुजंग विविधं महिद्धि,
पुत्तेन थेर भुजगेन दमापयन्तो|
इदूपदेश विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंङलानि||७||
दुग्गहदिठ्ठी भुगजेन सुदठ्ठ हत्थं,
ब्रम्हंविसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं|
ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो,
तंं तेजसा भवतु ते जयमंङलानि||८||
एतापि बुद्ध जयमंङ्गल अठ्ठगाथा,
यो वाचकोदिनदिने सरते मनन्दि|
हित्वाननेक विविधांनी चुपछद्दवानि मोक्खं
सुखं अंधिगमेय्य नरोसपञ्ञो||९||
मराठी अर्थ
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हत्यार धारण करुन सहस्रबाहू गिरीमेखाला, हत्तीवर आरुढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला, आपल्या दान आदि धम्म बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||१||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, माराव्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठूर-ह्रदयी अशा आलवक नामक यक्षाला, शांती आणि संयम बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||२||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, अग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्तम अशा निलगीरी हत्तीला आपल्या मैत्रीरुपी पावसाने जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो.||३||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत न थांबता धावणार्या अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या, आपल्या रिद्धी बलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||४||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने,पोटावर काष्ट बांधून गर्भवती सारखे आपले पोट मोठे त्या चिंचा नामक स्त्रीला(जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती) आपल्या शांत आणि सौम्य बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||५||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, सत्य सोडलेल्या व असत्य वादाचा पोषक, अभिमानी वादविवादात पारंगत व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकाला प्रज्ञा – दीपाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||६||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, विविध ऋद्धी संपन्न नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामौद़ल्यायन शिष्याकडून ऋद्धी, शक्ती आणि उपदेशाच्या बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||७||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, भयंकर मिथ्थादृष्टीरुपी सापाने डसलेल्या विशुद्ध ज्योती आणि ऋद्धी शक्ती संपन्न बक नामक ब्रम्हज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||८||
जो कोणी पाठक ह्या बुध्दाच्या आठ मंगल गाथा दक्षतापूर्वक दररोज म्हणेल तो बुध्दिमान पुरुष नाना प्रकारच्या. उपद्रवापासून मुक्त होऊन सुख प्राप्त करील.||९||
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत