दीक्षाभूमीवर लाखो लोकांचे स्वागत करताना

विनायकराव जयवंतराव जामगडे
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर सात लाख लोकांना एकाच वेळी धम्म दीक्षा देऊन नविन जीवनात प्रवेश केला.परपराने. पूजत असलेले देव देव्हारे सिमेंच्या बाहेर फेकले .मनात कोणतीही भिंती बाळगली नाही.कारण बाबासाहेब आंबेडकरांनी समाजावून सांगितले की आपले भले कशात आहे.रूढी परंपरेमुळे आपणावर पशुपेक्षाही हीन जीवन जगण्यास बाध्य केले.गुलामीचे लाचारीचेअपमानित जगावे लागत असे.ते जीवनमान संपवून स्वाभिमानाने जगण्यास शिकविले.,१४/१०/१९५६नतर स्वाभिमानाने जगण्यास शिकविले.ताट मान करून चालू लागले नव संस्कृतीला स्विकारले.परपरेने चालत आलेले गुलामीचे कामधंदे बंद केले त्यामुळे सवर्ण लोक चिडुन अन्याय अत्याचारमोठया प्रमाणात होऊ लागले त्याही परिस्थितीत धीर सोडला नाही.मुकाबला केला.अशिक्षित असून सुद्धा धम्माचे अनुसरण केले.एकोपानेजगू लागले.मुलाना शिक्षण दिले
शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाला.शिकून मोठ्या पदावर कार्यरत असून सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून सेवेत रूजू झाले.राहनीमान बदलै सांपत्तिक स्थितीत सुधारणा झाली.हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहून जे आरक्षण दिले. त्यामुळे हे प्राप्त झाले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी समाजात अशिक्षित पणा होता परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती एकनिष्ठता होती एका हाकेला गोळा होत होते.समाज संघटित होता.समाजाचा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे अन्याय करतांना विचार करावा लागत असे.परतु समाज विभक्त झाला. बौद्ध विहारात गटबाजी सुरू झाली. आपल्या एकाधिकारशाहीने काम सुरू झाले.सामाजिक राजकिय दृष्टिने विभागल्या गेले.
प्रस्थापित व्यवस्थेने या विभक्त पणाचा फायदा धेत आपल्या बाजूने वळविणे सुरू केले.समाजात कायमचीच फूट राहील.यासाठी प्रयत्नशील असतात. नव नविन आमिषे दाखवून आपल्या खुंट्याला बांधले. त्यांच्या शेंबड्या पोरांचे ऐकतील परंतु आपल्या शहाण्या माणसाचे ऐकणार नाही.
दीक्षाभूमीवर दर वर्षी लाखो लोक बौद्ध होतात परंतु बंधुत्व दिसत नाही.जी करूणा समता ही मूल्ये दिसत नाही.
विषमतावादी आपले तत्वज्ञान पेरीत असतात ते हिन्दु राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिने घोडदौड करित आहे.परत जातीयवादी असमानता यावी ह्यासाठी प्रयत्नशील आहेत.ते संघटित एकजूट आहेत.ते आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करून देव धर्म पुजा अर्चना यात गुंतवितात.आपले झापडे बांधून आजूबाजूला पाहता येणार नाही याची दक्षता घेतली जाते.तुमच्याही खाली जात आहे म्हणुन असमाधान माणण्याचे कारण नाही.ते आपले जाळे पसरवित असून त्यात अडकविण्यासाठी कार्यरत असतात. सत्तेसाठी जे आसूसले आहेत अशांना ते बांधण्यास तयार असतात
बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती करून मानसिकतेत बदल घडविला.समता स्वातंत्र्य करूणा बंधुत्व ही जीवन मूल्ये दिली .नव व्यवस्था दिली संघटना लोकशाहीने आचरण करण्यास शिकविले. संघटित एकजूट होऊन संघर्ष केला तर विषमतावादी व्यवस्था ला मूठमाती देऊ शकतो.
६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना धम्म बांधव एकजूट होऊन आपलीं ताकत दाखवून बौद्ध आंबेडकर तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून समतावादी समाजासाठी धडपड करतील अशी आशा करू या.नविन बुद्ध राष्ट्र निर्माण करू या.
विनायकराव जयवंतराव जामगडे
७८२३०९३५५६
९३७२४५६३८९
!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत