तर आजचा विषय आहे महावितरणचे येणारे आवाच्या सव्वा बिल
साध्या घरात राहणाऱ्या सामान्य माणसाचे ही बिल कॉपी आहे त्याच महिन्याचे युनिट पडले आहे केवळ 86 एवढे आता महावितरण सांगते जर युनिट 100 च्या आत असेल तर तुम्हला दर आहे 4.71 रुपये,100-300 साठी 10.29 रुपये,300-500 साठी 14.55,1000च्या वर 16.64 रुपये,आता गणित सांगते 86×4.71=405.06 रुपये हे बिल भरणे त्यांचे कर्तव्य आहे.
पण बिल दिले आहे 770 रुपये आता वरचे 295 रुपये एवढा आकार ग्राहक ज्यादा भरतोय त्याची विभागणी अशी आहे.
1) स्थिर आकार- म्हणजेच महावितरणच्या मीटर चे भाडे आता मीटर चे भाडे सुद्धा घेतात मीटर नवीन लावताना पैसे सुद्धा घेतात आणि मीटर खराब झाला की पुन्हा आपल्याकडूनच पैसे घेतात म्हणजे थोडक्यात मीटर तुम्ही विकत घेऊन महावितरनाला महिन्याला भाड दया
2)वहन आकार – वहन आकार म्हणजे वीज जिथून तयार होते तिथून तुमच्या घरापर्यंत येण्यासाठीचा जो खर्च होतो तो तुम्हाला भरायचा आहे त्याचा आकार असा आहे प्रत्येक युनिट साठी 1.17 रुपये.
3)इंधन समयोजन आकार-म्हणजेच महावितरणला वीज बनवण्यासाठी जो कोळसा,डिझेल जे काही इंधन लागतंय ते तुम्हीच भरायचे आहे जो की आहे 0.45 रुपये प्रति युनिट 100 युनिट पर्यंत आणि 0.8रुपय 100-300 युनिट साठी 1000 युनिट च्या पुढे 1.15 प्रत्येक युनिट साठी.
4)वीज शुल्क(16%)- म्हणजे तुम्ही वापरलेल्या विजेवर 16% एवढा कर तुम्हाला भरायचा आहे म्हणजे 16 रुपय प्रत्येकी 100 रुपयावर.
हे छोटेसे गणित आहे फक्त 86 युनिट साठी 295 रुपये ज्यादा देण्यासाठी हेच तुमचे युनिट 150 असतील तर तब्बल 600 रुपये ज्यादा देणे आहे 350 असतील तर तुमचे मूळ बिल असलं 2014 आणि ज्यादा आकारचे तब्बल 1148 म्हणजे तुमचे बिल 2014+1148=3162 रुपये.
सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबाचे बिल हे 60-350 युनिट च्याच आसपास असते आता एवढा आकार ज्याचे लावून ज्या प्रकारे महावितरण जी आपल्याला सेवा देत आहे त्यासाठी आमची महावितरनाला विनंती आहे अजून एक दोन कर वाढवून घ्यावे.
कर्मचारी पगार भत्ता-1.5 प्रत्येक युनिट आणि कर्मचारी प्रवास कर-0.5 प्रत्येक युनिट म्हणजे जनतेला काळजीच नाही महावितरण पण नफ्यात येइल आणि सरकारला पण 4 पैसे मिळतील.
मध्यम वर्गीय ग्राहकांना जोपर्यंत हे गणित समजत नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही की त्यांना ज्या फुकट च्या योजना सरकार कडून मिळतात त्या सरकार कडून फुकट नसून अश्या प्रकारे दुसऱ्या बाजूने वसुल होतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत