बोंबेवाडी गावचे सुपुत्र स्वप्निल मोटे आणि आकाश शेजाळ यांची सैन्य दलात भरती झाल्याबद्दल गौरव सत्कार सोहळा
बोंबेवाडी गावाचे अभिमान, स्वप्निल प्रकाश मोटे आणि आकाश महादेव शेजाळ यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात व युवा नेते सौरभ भैय्या पाटील यांच्या हस्ते या दोघांचा शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला –
सत्कार सोहळ्याची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून झाली. बोंबेवाडी गावातील सरपंच, उपसरपंच, आजी-माजी नेते, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रा. डॉ . रामदास नाईकनवरे सर सुरेश मोटे सर, जनार्दन मोटे सर,महादेव शेजाळ, बाळासो पाटील, अभिमन्यु विभुते, मच्छिंद्र शेजाळ, पांडुरंग शेजाळ, सुधीर विभुते, सिद्धनाथ शेजाळ आणि अनिल विभुते यांची प्रमुख उपस्थित होती.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात यांनी मनोगत व्यक्त करताना तरुणांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिकवण सांगत, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, मुलांप्रमाणे मुलींनाही समान संधी आणि शिक्षण दिले पाहिजे, यामुळेच समाजाच्या खऱ्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल.
कार्यक्रमाचे आयोजन नामदेव खरात, साहिल खरात, वैभव खरात, आकाश खरात, अभिजीत खरात, नितीन खरात, रवींद्र माने, किरण माने यांनी केले होते. बोंबेवाडी गावातील महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने गावातील युवकांनी स्वप्निल मोटे आणि आकाश शेजाळ यांना प्रेरणास्थान मानून शिक्षण आणि समाजसेवेच्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत