धर्मापेक्षा राष्ट्र महान डॉ बाबासाहेब आंबेडकर
दत्ता गायकवाड,
धर्मापेक्षा राष्ट्र महान बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशाबद्दल सार्थ अभिमान होता. मी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा आहे असे म्हणण्यापेक्षा मी भारतीय आहे असे म्हणणे त्यांना अधिक संयुक्तिक वाटत होते त्यांना धर्मापेक्षा राष्ट्र महान वाटायचे म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की काही लोक धर्माआधी देश नंतर काहींच्या मते देश आधी आणि धर्म नंतर आणि परंतु माझ्या मते देश आधी नंतर देखील देशच. डॉ. आंबेडकरांच्या या विधानावरून त्यांनी धर्मापेक्षा देशाला विशेष महत्त्व दिले आहे हे स्पष्ट होते. देशात विविध धर्माचे लोक राहतात जर प्रत्येकाने आपापला धर्म श्रेष्ठ आहे असे म्हटले तर वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये संघर्ष होईल देशात शांतता नांदणार नाही देश हा कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा नसतो भारताचा विचार केल्यास येथे हिंदू बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन जैन शीख या सर्व धर्माचे लोक आहेत प्रत्येक धर्माच्या लोकांनी माझा धर्म महान म्हटले तर या देशात यादवी निर्माण होईल. राष्ट्राच्या एकतेवर आघात होईल. राष्ट्रातील लोकांमध्ये धर्माभिमान निर्माण होण्याऐवजी त्यांच्यात राष्ट्राभिमान होणे आवश्यक आहे अन्यथा राष्ट्रीय संकल्पनेला तडा जाईल ही गोष्ट लक्षात घेऊन जात धर्म वंश इत्यादी आधारावर नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करण्यात येऊ नये अशा प्रकारची तरतूद डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत केली आहे.
दत्ता गायकवाड,
सोलापूर. 4/10/2024 7588266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत