रयतेला ब्राम्हणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी शिवरायांनी दुसरा शाक्त राज्याभिषेक केला:– प्रबुद्ध साठे
मुंबई (दादर) :– बहुजन प्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज हे अंधश्रद्धाळू नव्हते तर विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे केवळ अपशकुन झाला म्हणून शिवरायांनी दुसरा शाक्त राज्याभिषेक केला नाही, तर पहिल्या गागाभट्टीय राज्याभिषेकाने अपमानित केले, स्वराज्याची लूट केली, म्हणून रयतेला ब्राम्हणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा शाक्त पंथीय राज्याभिषेक करून एकप्रकारे बौद्ध धम्माचा स्वीकार केला असे वास्तव्य इतिहास मांडताना प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे यांनी स्पष्ट प्रतिपादन केले , ते मुंबई दादर येथील आंबेडकर भवन या ऐतिहासिक ठिकाणी आयोजित शाक्त पंथीय दुसरा राज्याभिषेक सोहळ्यात प्रबुद्ध मार्गदर्शक वक्ते म्हणून बोलत होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब हे होते, प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम (बापू) कामठे, , युवा व्याख्याते रोशन पाटील, माजी अतिरिक्त न्यायाधीश डी के सोनवणे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते, प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले,राज्याभिषेक ही मूळ बौद्ध धम्मीय संकल्पना आहे, छत्रपती व चक्रवर्ती दोन समान शब्द असून ते बौद्ध धम्मीय आहे , छत्र व चक्र म्हणजे धम्म चक्र पुढे त्यास अशोक चक्र म्हटले, त्यामुळे सम्राट अशोक प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श धम्म राज्य निर्माण करणारे बौद्ध राजे होते,, चक्र पूजेशिवाय शाक्त राज्याभिषेक होवू शकत नव्हता, त्यासाठी अस्पृश्य स्रीशी शैव विवाह करावा लागतो, शिवरायांनी अस्पृश्य स्रीशी शैव विवाह करून शाक्त पंथाचा म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्यामुळे 24 सप्टेंबर हा केवळ दुसरा शाक्त राज्याभिषेक दिन तर आहेच परंतु तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याचा धम्म क्रांती दिन ही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने साजरा करावा, दुसरा शाक्त राज्याभिषेकाने जातिव्यवस्था नष्ट करण्याची प्रेरणा दिली व आंतरजातीय विवाहाला समाज मान्यता मिळवून दिली, आता शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बहुजन समाजाने हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेची गुलामी नाकारून बौद्ध धम्माचा स्वीकार करून घरवापसी करावी असे ही आवाहन प्रबुद्ध साठे यांनी केले, अध्यक्ष भाषणात भीमराव आंबेडकर यांनी सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले सत्य इतिहास मांडून बहुजन समाजांनी संघटीत व्हावे आमच्या तुम्हाला नेहमीच शुभेच्छा व पाठिंबा असेल, आमचे आजोबा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्रावर जय शिवाजी जय भवानी लिहित असे, जय शिवराय जय भीमराय हेच आमचे नाते आहे असे ही ते म्हणाले, रोषण पाटील यांनी ही आपली भूमिका मांडली, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या अध्यक्षा सीमाताई पाटील, धम्म प्रचारक सुरेश त्रिभुवन गुरुजी, संगीतकार दिग्दर्शक जॉली मोरे, सूर्यकांत खरात, दिपक चौघुले, आदी पदाधिकार्यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन आनंद म्हस्के यांनी केले, या ऐतिहासिक सोहळ्यास बहुजन समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत