नळदुर्ग येथील प्रेक्षणिय डोळे टिपवुन टाकणारा बोरी धरणाचा सांडवा ओसांडून वाहु लागला
नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले सांडण्याचे जलपूजन , नळदुर्गकर आनंदी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
एक वर्षाच्या प्रदीर्घ दिवसानंतर परत एक बार नळदुर्ग या ऐतिहासिक नळदुर्ग शहरात बोरीधरण 100 % टक्के भरले असून ते बोरी धरणाचा सांडवा ओसंडून वाहत आहे यामुळे नळदुर्गकरां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे हा सांडवा पाहण्यासाठी नळदुर्ग , अणदूर , कारखाना , तुळजापूर आधी ठिकाणहून सांडवा पाहाण्या साठी गर्दी केली होती . सांडवा म्हणजे प्रेक्षकांची डोळे टिपवून टाकणारे दृश्य पर्यटकांना पाहायला मिळाली या पर्यटकांनी मात्र मनमुराद आनंद लुटला एक वर्ष भरात बोरी धरणातला पाणी साठा कमी झाला होता फक्त ६% टक्के पाणीसाठा धरणामध्ये असल्याने नागरिक चिंतेत होते परंतु नळदुर्गकरांवर निसर्गाची कृपा परतीच्या पावसानंतर बोरी धरण मात्र तुडुंब भरले असून निसर्गाचे वरदान नळदुर्ग कराना मिळाले आहे बोरिधरणाचा सांडवा ओसंडून वाहत असलेला दिसून येत आहे त्यामुळे नागरिकात व पर्यटकात आनंदाचे वातावरण पसरले आहे सांडवा चालू होताच नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने जल पूजन करण्यात आले यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , पत्रकार तानाजी जाधव , पत्रकार लतीफ शेख , माजी नगर सेवक सुधिर भैया हजारे पत्रकार दादासाहेब बनसोडे , पत्रकार मित्र अमर भाळे , पत्रकार भगवंत सुरवसे , शिवाजी नाईक अजित चव्हाण , नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव ,आधी जणांनी बोरिधरणाच्या सांडव्याचे जल पूजन केले यावेळी इतर पर्यटकांनी सुद्धा मनपुरात आनंद लुटला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत