महाराष्ट्रातील भोगवटदारांनो सावधान ! बिहारच्या नवादा कृष्ण नगर मध्ये “महादलित” समाजाची 80 घरे पेट्रोल टाकून जाळून खाक !
विजय अशोक बनसोडे
महाराष्ट्रातील भोगवटदारांनो सावधान ! बिहारच्या नवादा कृष्ण नगर मध्ये महादलीत समाजाची 80 घरे जाळून खाक ! अनेक महिला-मुलींचा विनयभंग करण्यात आला, त्यांचे पदर आणि ओढण्या ओढण्यात आल्या, त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले.तर जनावरावर हल्ला केल्याप्रमाणे माणसावरती अनेक राउंड केला गोळीबार…. भारतीय जनता पार्टी सरकारची बघायची भूमिका…मांझी आणि नितीश कुमार प्रकरण दाबण्याच्या तयारीत तर तेजस्वी राजकारणात करण्यात
मग्न !
तथागत गौतम बुद्धाच्या भूमीमध्ये अग्नितांडव,तर बिहार सरकार जातीवादाच्या नशेत !
संवैधानिक संसदीय लोकशाहीच्या शासन काळात आज 2024 मध्ये सुद्धा संविधाना संविधानाने बंधनकारक केले असलेल्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य उद्योग देशातल्या मागासवर्गीयांना किंवा प्रत्येक नागरिकाला देण्यास केंद्र आणि राज्य सरकारे अपयशी ठरलेली आहेत,हे भयान वास्तव बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील कृष्णा नगर भागात महादरीत जातीच्या 80 घरांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले या घटनेवरून दिसून येते.ते ही सनातनी सनातनी विचारसरणीला मातीत घडणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या भूमीमध्ये होय.सरकारी जमिनीवर मागच्या 50 वर्षापासून निवासी वास्तव्य करणाऱ्या महादुरी जातीच्या लोकांच्या घरांना जाळण्यात येतं,महिलांना बेअब्रू करण्यात येतं,पुरुषांना मारण्यात येते. खरं तर ही बाब सरकारला नव्हे तर स्वतःला फुले,शाहू,आंबेडकरवादी विचारसरणीच्या काय कार्यकर्ते नेते आणि पुढाऱ्यांच्या थोबाडात लगावलेली चपराकच आहे.
नवादाच्या गावगुंडांना सांभाळण्यात आले आहे काय ? कुठून एवढी हिम्मत मिळते !
बिहारातील जंगली राजवटीचे आणखीन एक उदाहरणं,बिहारमधील जि.नवादा, मुफलीस पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा नगरात नंदकुमार पासवान या नगरसेवकाच्या आदेशानुसार गावगुंडांनी “महादलित” जातीच्या दलित वस्तीवर सायंकाळी साडेसात वाजता अमानुष हल्ला केला.त्यांनी या भागात 50 राऊंड फायरिंग केले.मुफलीस पोलीस ठाण्यातंर्गत कृष्णानगर गावात गावगुंडांनी “महादलित” जातीच्या वस्तीमधील 80 घरांना पेट्रोल टाकून आग लावली.
कृष्ण नगर गावातील सरकारी जागेवर पन्नास वर्षापासून “महादलित” समाजाची वस्ती आहे !
कृष्ण नगर वसाहतीतील या सरकारी जमिनीवर महादलीत मागासवर्गीयांची वस्ती मागच्या पन्नास वर्षापासूनची आहे. इथेच या महा दलित वस्तीतील लोकांनी शेळीपालन,गुरेपालन, तर काही प्रमाणात जमीन कसून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात. या सरकारी जमिनीला हडप करण्यासाठी गावातीलच पासी समाजाच्या गावगुंडानी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हाताशी धरून महादलीत वस्तीवर हल्ला केला. एकाला जमीन हडप करायचे आहे तर दुसऱ्याला जमिनीवर आपला परिवार परिवाराचा उदरनिर्वाह आणि निवास करायचा आहे. त्यामुळे जमीन हडपण्याच्या वादातून महा दलित मागासवर्गीयांवर जीवघेणा हल्ला केला.दोन्ही पक्ष जमिन त्यांची असल्याचा दावा करत आहेत.पण ही जमीन बिहार सरकारची असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10 लोकांना अटक केली आहे.तर इतर आरोपींची धरपकड सुरू आहे.पोलिस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
गावगुंडांनी दलित वस्तीवर हल्ला केला आणि 80 घरं जाळली,गुंडांनी गोळीबार केला.जमिनीच्या मालकी वादातून हा प्रकार घडला.या घटनेमुळे बिहार मधील मागासवर्गीय समाज दहशतीखाली असून जातीवादी सरकार व प्रशासन झालेली घटना गंभीर नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
150 गावगुंडाने गोळीबार करत केला हल्ला कित्येक महिला-मुलींचा केला विनयभंग !
गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 100 हून अधिक गावगुंड अचानक दलित वस्तीत घुसले.त्यांनी अचानक अनेक राउंड गोळ्या झाडल्या. त्यामुळे या भागातील लोक घाबरले. गुंडांनी जवळपास 50 राऊंड फायरिंग केले.स्वतःला वाचवण्यासाठी वस्तीतील लोकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळणाऱ्या महिला आणि मुलींना धरून ओरबडण्यात आले. महिलांच्या साड्या ओढण्यात आल्या पदर हिसकावण्यात आले तर मुलींच्या ओढण्या ओढून त्यांना अश्लील शिवीगाळ करत धमकावण्यात आले. कित्येक महिला पुरुषांना मुलींना आणि लहान मुलांना सुद्धा अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर गुंडांनी या महादलित वस्तीला आग लावली.घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहचले खरे परंतु सत्य परिस्थिती करण्याचे धाडस त्यांच्यात मात्र दिसून आले नाही. यावरूनच बिहार मधील कायदा कानून किती बेबस आणि लाचार आहे.याची प्रचिती सुद्धा आली.
महादलित मागासवर्गीयांच्या वस्तीवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक तर कित्येक आरोपी फरार !
नवादाचे पोलीस अधिक्षक अभिनव धीमान यांनी या घटनेची माहिती देताना सांगतात की,बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यात 40 ते 50 घरांना आग लावल्याचे समोर येत आहे.या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही अथवा कुणाचा मृत्यू झालेला नाही.गावगुंडांनी हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10 जणांना अटक केली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने इतर आरोपींची ओळख पटवली आहे.त्यांची धरपकड सुरू आहे. पोलीस अधीक्षक धिमान यांच्या स्टेटमेंट वरून ते या प्रकरणाप्रती किती गंभीर आहेत याचीच प्रचिती येते.
या दलित अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकुमार पासवान हा बिहार पोलीस मधून रिटायर्ड आहे. तर त्याचा मुलगा नागेश्वर पासवान हा कृष्ण नगर वॉर्ड मेंबर असून यांनी जवळपास शंभर दीडशे गाव गुंडांचे नेतृत्व करत हातात बंदुकी घेऊन “महादलित” वस्तीवर हल्ला केला. ही वस्तुस्थिती असताना केवळ या पुढील निवडणुकीत या जातीय अग्निकांडाच्या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी पोलीस प्रशासन आणि तिथली नेतेमंडळी राजकारण करण्यात व्यस्त आहेत.
बिहार सरकारातील मंत्री,संत्री,मुख्यमंत्री यांच्या उदासीनतेमुळे महादलित वस्तीवर पेट्रोल टाकून हल्ला !
बिहार सरकारातील मंत्री,संत्री,मुख्यमंत्री यांच्या उदासीनतेमुळे महादलित वस्तीवर पेट्रोल टाकून हल्ला करण्यात आला.
बिहारचे मंत्री,संत्री,मुख्यमंत्री एकमेकांवर आरोपाच्या फेरी करण्यात व्यस्त,खरं तर प्रशासनाच्या आणि सरकारच्या दुर्लक्षामुळेच महादलित वस्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.हे त्रिकाल सत्य असतानाही आप आपल्या जबाबदाऱ्या झिडकारून टाकण्याचे काम करण्यात येत आहे.जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे.दोन्ही पक्ष अनेक वर्षापासून या जमिनीवर ताबा सांगत आहेत. त्यातून ही घटना घडली आहे. जोपर्यंत शांतता राहणार नाही,तोपर्यंत पोलिसांचा आता येथे तळ राहिल,असे त्यांनी स्पष्ट केले.तर बिहार सरकारच्या अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचे मंत्री जनक राम यांनी आरोपीं विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
कृष्ण नगरातील “महादलित” वस्तीवरील गोळीबार व अग्निकांड हल्ल्यातील ठळक बाबी !
👉 बिहारमध्ये गुंडांनी दलितांची 80 घरे जाळली:ग्रामस्थ म्हणाले- अनेक राऊंड गोळीबार; परिसरात तणाव, 5 पोलीस ठाण्यांमधून पोलीस तैनात.
👉 बिहारमधील नवादा येथील दलित वस्तीत बुधवारी रात्री 8 वाजता गुंडांनी 80 घरांना आग लावली. आरोपींनी गोळीबारही केला.लोकांना मारहाण ही केली. यानंतर येथे तणावाचे वातावरण आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 5 पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे कारण जमिनीचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
👉 आगीत गुरे ही जळून खाक झाली, मात्र इतर जीवितहानी झाली नाही हे प्रकरण नवादा जिल्ह्यातील मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील दादौर येथील कृष्णा नगर दलित कॉलनीशी संबंधित आहे.अनेक गुरे, शेळ्या अग्निकांडात जळून खाक झाल्या.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत घरात ठेवलेले साहित्य जळून राख झाले होते.
कृष्णा नगर भागातील “महादलित” वस्ती गोळीबार व अग्निकांडात “भूमाफिया” आणि सरकारचाही “हात” असू शकतो !
बुधवारी सायंकाळी आठ वाजता माफियांनी गावात आग लावली.बुधवारी सायंकाळी आठ वाजता माफियांनी गावात आग लावली.जमिनीबाबत वाद,प्रकरण न्यायालयात या घटनेचे कारण जमिनीचा वाद आहे. गावात मोठ्या भूखंडावर दलित कुटुंबे राहतात. या भूखंडाबाबत अन्य पक्षाशी वाद सुरू आहे. त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.बुधवारी सायंकाळी उशिरा गुंडांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. मारहाण केली. घरे जाळण्यात आली,गोळीबारही केला.गावकऱ्यांनी सांगितले की, 80-85 घरांना आग लागली.बुधवारी रात्री ८ वाजता प्राण बिघा येथील नंदू पासवान, नागेश्वर पासवान यांच्यासह शेकडो लोकांनी मिळून गावावर हल्ला केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सोबतच वेगवान गोळीबार ही सुरू झाला.अनेक गावकऱ्यांना मारहाणही करण्यात आली. यानंतर 80 घरांना आग लावली.गावकऱ्यांनी सांगितले,ते अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत होते.ही जमीन बिहार सरकारची आहेयावर भूमाफिया लक्ष ठेवून होते.काही दिवसांपासून तो जमीन विकत ही होता. आम्ही त्याला विरोध करत होतो.यावेळी
डी.एम म्हणाले,10 जणांना अटक करण्यात आली आहे.
लेखक,विजय अशोक बनसोडे
जि.संस्कार उपाध्यक्ष,धाराशिव (द)
भारतीय बौद्ध महासभा 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत