प्रा डॉ भाऊ लोखंडे बहु आयामी व्यक्तीमत्व

प्रा डॉ भाऊ लोखंडे हे विद्या व्यासंगी वादविवाद पटू आंबेडकरी निष्ठ चळवळे .
अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठणारे होते. ओमप्रकाश नाहाटा यांचा प्राचार्य यांच्या टेबलावर खून झाला त्याला वाचा फोडण्यासाठी नागपूरात विद्यार्थी यांचा मोर्चा काढून त्या घटनेचा निषेध केला. न्याय देण्याची मागणी केली. त्यावेळी केलेलै जोश पूर्ण भाषण तरूणांचे रक्त खवळणारे होते. त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांची चुणुक दाखविली.
कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण भाषण करीत असत सभेत श्रोत्यांचे टाळ्या भरपूर घेऊन व्याख्यानात रंग भरत असत. आपला विषय मुद्दे सुद मांडून सभा जिंकत असतं. त्यांच्या भाषणात शेरोशायरी ची रेलचेल असे.
अनेक पुस्तकांचे लेखक उत्तम शिक्षक
पाली संस्कृत हिंदी इंग्रजी भाषेवर प्रभूत्व होते. ते कवी होते उत्कृष्ट संपादक होते. निकाय मासिकाचे संपादन करून दर्जेदार साहित्याची निर्मिती केली. ते बौद्ध धर्माचे गाडे विद्वान होते. बौद्ध धर्म ग्रंथाचे लेखन केले आहे.पाली साहित्याचे मराठीत भाषांतर करून मराठी वाचकांची सोय केली.मनमिळाउ स्वभाव त्यामुळे मैत्री सर्वांसोबत
असे.कोणावर रागावले असले तरी काही वेळानी त्यांच्या सोबत प्रेमाने चर्चा करीत असत.कोणासोबत शत्रुत्व करीत नसत. त्यामुळे सर्वांचे आवडते होते.भाऊ आपणा सर्वांना सोडून गेले.22/9/2020ला त्यांना विनम्र अभिवादन
विनायकराव जामगडे 9372456389
7823093556
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत