महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

नको उगाच कावकाव….

सकाळी सकाळीच माय मही
मह्यावर खेककली
मले म्हणाली ..
“आरं पोरा उठ…तयारी कर आज पितरपाठ हाय”
तुह्या बापाले जेवू घालायचं की नाय”
“आवरून घे लवकर म्या निवद बनवून ठेवला हाय”
“तुले बाजारात जाऊन
दारू अन बिडीचा बंडल आणायचा हाय”
म्या मायेला म्हणालो
“आये सारी जिंदगी तू
मह्या बापाले दारू पितो म्हणून कोसत होती
त्या दारू पाई मव्हा बाप मेला
तू ऊर पटकून रडत होती
दारुले तू तर अवदसा सवत म्हणत होती
अन बिडीच्या वासाने तुले मळमळ होत होती
मग काहून बाप मव्हा मेल्यावर
असे थेरं करती”
तर माय मले म्हणाली
“लेका जनरीत हाय
धर्मानुसार चालावं लागतं
असं केलं तरच
तुह्या बापाच्या अत्म्याले शांती भेटत”
आता लवर ताट पत्र्यावर ठेव
कावकाव करून कावळ्याला बोलवं
कावळ्याने निवद शिवला
समज मग तुहा बाप जेवला”
म्या गप्पगुमान ताट छतावर ठेवलं
कावकाव करत बसून राहिलो
तासाभराने एक कावळा आला
निवदावर तुटून पडला
म्यायने मह्याकडं म्या मायकडं पाहिलं
मायने हुश्शsss करत श्वास सोडला
तसा दुसरा कावळा आला
निवदावर तुटून पडला
तिसरा आला,चौथा आला,पाचवा आला
म्हणतात म्हणता बरेच कावळे जमा झाले
म्या मायले म्हंटले
“वं माय महे इतके बाप ?
तू काहून नही मले सांगितले
नेमकं यातला मव्हा बाप कोणता?
माय मही गप्प होती
तितक्यात ते कावळे दुसऱ्याच्या,तिसऱ्याच्या तटावर बसले
म्या परत मायले म्हणालो
“आये मह्या बापाचे इतके लफडे
त्वां कसे सहन केले?
माय गप्पच होती
मग मी मायला म्हणालो
आये जित्यापणी माणसाला पोटभर खाऊ घालावं
मेलेला माणूस खात नाही
स्वर्ग नरक आत्मा कुणी पाहिला?
कुणीच छातीठोकपणे सांगत नाही…
अंग आये …घरासाठी राबवताना बाप मव्हा बैल व्हायचा
नाईन्टी मारल्यावर बाप मव्हा
रफी किशोर होऊन गायाचा
संकटात बाप मव्हा वाघ होऊन लढाचा
आनंदात बाप मोरा सारखा नाचायचा
घरखर्च प्रपंच चालवताना
धूर्त कोल्हा बाप व्हायचा
अन मेल्यावर बाप मव्हा कावळा झाला
हा प्रश्न डोक्याला नाही झेपायचा…
अग जित्या माणसाला जातीत विभागणार धर्म
मेल्यावर एकाच पक्ष्याच्या जातीत कसा घालतो?
जसं जातिजातीत माणसे विभागली
तशी मेल्यावर ही व्हाययला हवी
इथल्या धर्माच्या चार वर्णाप्रमाणे
माणूस मेल्यावर ही
चार वर्णात हवा
बामनाचा बाप मोर राजहंस
क्षत्रियांचा बाप गरुड घार
वैश्याचा बाप घुबड
अन शूद्राचा बाप कावळा व्हावा
पण माय सारच उलट हाय
जित्यापणी जातीत भेदभाव करणारे
मेल्यावर मात्र एकच
कावळे होतात
अन आपल्या सारख्याल
अंधश्रद्धेच्या नावाखाली बावळे करता
माय माणूस मेल्यावर राख अन माती होती
उरते फक्त सत्कर्म
हेच खरे जीवनाचे मर्म
बाकी सर्व झूठ धर्म
जित्याला पोटभर खाऊ खालू
पितरपाठाचे यापुढे नको काढू नाव
आता सत्यशोधक होऊ
नको उगाच कावकाव….

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी( राजन)
९१७२२ ९१४४८
१८/०९/२०२४
टीप ही कविता ©® कॉपीराईट असून कुणीही कवींचे नाव खोडू नये,कविता आवडल्यास नावासाहित फॉरवर्ड व शेअर करा
आपला अभिप्राय 9172291448 वर कॉल किंवा व्हाट्सएप करा
ही कविता कोणत्याही धर्माची धार्मिक भावनांना ठेच पोचवत नसून मानवतावादी सत्यशोधक प्रबोधन करण्यासाठी व अंधश्रद्धा पसरवू नये म्हणून लिहण्यात आली आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!