अकोला – भाजप प्रदेश अध्यक्ष ह्यांचे उपस्थितीत आज भाजपने केलेले आरक्षण आंदोलन म्हणजे नौटंकी असून काँगेस सारखीच आरक्षण विरोधी धोरणे भाजपने आखली असून आरक्षित घटकांना मारक धोरणे भाजपने राबविली असून अनुसुचित जाती जमाती व ओबीसी करीता काँगेस सापनाथ असून भाजप नागनाथ असल्याची टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
काँग्रेसने खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे नांवावर देशातील आरक्षण संपविण्याची सुरुवात केली होती.आता राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचा अजेंडा जाहीर केला असून भाजपने 2014 पासून प्रत्यक्ष आरक्षण संपविण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेस – भाजपने बाय लॅटरल एंट्रीचे नावावर आरक्षण डावलून केंद्रातील सचिव पदे भरली आहे.घटनेत नसलेले 10% आर्थिक आरक्षण लागू आहे. पदोन्नती मधील आरक्षण दिले नाही.वर्ग 1 ते 4 च्या जागा आरक्षण न ठेवता खाजगी कंपनी मार्फत भरल्या आहे.शिक्षण हक्क कायदा कमकुवत करून टाकला असून आर टी ई शाळाचा हजारो कोटी निधी प्रलंबित ठेवला आहे.केंद्र सरकारने शिष्यवृत्ती मधला 50% मॅचींग फंड न दिल्याने शिष्यवृत्ती आणि स्वाधार निधी 2021 पासून मिळत नाही.ओबीसी आरक्षण साठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ जवळ चार वर्षे झाल्या नाहीत त्यामुळं खुल्या व आरक्षित घटकांचे प्रतिनिधित्व नाकारले जाते आहे.राज्यात प्रशासक राज आले आहे.खाजगी महाविद्यालय व ख
खाजगी शाळाचे पेव फुटले असून जिल्हा परिषद व नगर पालिका, महापालिकेच्या शाळा बंद करून ह्या मोक्याच्या जागा हडप करून खाजगी कंपनीला खिरफात म्हणून वाटप करण्याचे षडयंत्र रचले आहे. अँग्लो इंडियन साठी असलेल्या राखीव जागा भाजपने रद्द केल्या आहेत.अनुसुचित जाती जमाती ओबीसी ह्यांचा निधी पळवून नेवून तो इतर प्रकल्प वर वळविला जातो. मुलींचे मोफत शिक्षण आणि उच्च शिक्षणात जात पडताळणी साठी मुदत वाढ ही अनुसुचित जाती जमाती करीता लागू नाही. अनुसुचित जाती जमाती अत्याचार रोखण्यासाठी असलेली हाय पॉवर कमिटी फडणविस मुख्यमंत्री होते तेंव्हा पासून गठीत केली नाही.राज्यात अनुसुचित आयोग 2017 पासून अस्तित्वात नाही.
अर्थात भाजप कडून आरक्षित वर्गाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कत्तल सुरू असून भाजप वाले कुठल्या तोंडाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेवून ही आरक्षण बचाव नौटंकी करीत आहेत असा संतप्त सवाल युवा आघाडीने उपस्थीत केला आहे.
देशाच्या आरक्षणाला जेवढा धोका काँगेस कडून आहे त्यापेक्षा अधिक धोका भाजप आणि त्यांच्या घटक पक्षाकडून असल्याने भाजपच्या नौटंकीस आरक्षित मतदार भीक घालणार नाही.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत