
प्रा.पंजाबराव येडे
तुकोबा आजही प्रतिगाम्यांना
तुमचीच धास्ती वाटते
तुमच्या पुरोगामी विचारांनी
त्यांची हातभर फाटते.
तुमच्या गाथा बुडवून
समाधान नाही झालं
गणपतीच्या रुपात दाखवून
बुडवायचं धाडस केलं.
कर्मकांडं बंद करून
त्यांची दुकानदारी थांबवली
त्यामुळेच तर तुकोबा
प्रतिगाम्यांची अवलाद भांबावली.
गणाचा अधिपती गणपती
आमचाही पूज्य आहे
तुकोबाच्या रुपात दाखवणं
आम्हाला त्याज्य आहे.
गाथा अन् तुकोबांना
तुम्ही बुडवू शकणार नाही
प्रतिगाम्यांनो परिवर्तनाला
तुम्ही अडवू शकणार नाही!
*प्रा.पंजाबराव येडे*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत