महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

लालबागचा राजा व्हीआयपी दर्शन बंद करा,मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी.

हरी हरा भेद । नाही करू नये वाद ।।१।। एक एकाचे ह्र्दयी । गोड़ी साखरेच्या ठायी।।जसा हरी- हरात भेद करू नये तसा भक्त भक्तानं मध्ये भेद करू नये अशी आपली संस्कृती सांगते.पण लालबागचा राजा गणपती मंडळाने सर्रासपणे या नियमाला तिलांजली दिली आहे.व्हीआयपींना रेडकार्पेट अथरून दर्शन दिले जात आहे तर सर्वसामान्य गणेशभक्तांना हाडतुड केले जात आहे. हा भेदभाव अयोग्य असून लालबागचा राजाचे व्हिआयपी दर्शन बंद करा अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.

गणेशभक्त चोवीस चोवीस तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे ओझरतं दर्शन घेत आहेत तर दुसरीकडे खास व्यक्तींना व्हिआयपीच्या नावाखाली थेट लालबाग राजाच्या पाया जवळ नेऊन दर्शन दिले जात आहे.याबद्दल मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनाही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी तर कळस झाला उर्फी जावेद या मॉडेलला व्हिआयपी च्या नावा खाली थेट श्रीच्या चरणी दर्शनाला नेण्यात आले.हे मात्र खटकणारे आहे.उर्फी चे समाजासाठी , देशासाठी काय योगदान आहे याचे उत्तर व्यवस्थापकांनी द्यावे.ही दर्शनाला रांग लावलेल्या गणेश भक्तांची थट्टा आहे. देवाने भक्ता भक्तानं मध्ये भेदभाव केला नाही मग लालबागचा राजा मंडळ भक्तां भक्तानं मध्ये भेदभाव कसे करू शकते असा सवाल ही तळेकर यांनी विचारला आहे.
रांगेत दर्शन घेणाऱ्या भक्तांना रेटा रेटीला सामोरे जावे लागते आहे. काही ठिकांणी मंडळांचे स्वयंसेवक भक्तांना धक्का बुक्की करत आहेत.नियोजनाचे तिन तेरा वाजले आहेत.मांढरगडावर जशी चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे प्राण गेले तशी परिस्थिती लालबागच्या राजाच्या ठिकांणी कधी ही घडू शकते अशी परिस्थिती आहे. एक गणेशभक्त दर्शनासाठी रांगेत चोविसतास उभा राहतो मात्र व्हिआयपी गणेशभक्त थेट श्रीच्या चरणी जातो हा भेदा-भेद लालबागचा राजा मंडळाने बंद करावा.

उर्फी जावेद यांचे मुंबईसाठी काय योगदान आहे माहीत नाही,पण डबेवाल्यांची मुंबईसाठी थोडे का होईना योगदान निश्चित आहे.जर डबेवाला कामगार लालबागचा राजा दर्शनास आला तर मंडळ त्या व्हिआयपी दर्शन देईल का असा सवाल ही तळेकर यांनी विचारला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!